प्रशासन अधिकारी प्रमोद टेकाडे मनपात रुजू अकोला मनपात दोन प्रशासन अधिकारी?
अकोला:उप संचालक अमरावती कार्यालयातील प्रमोद टेकाडे प्रशासन अधिकारी म्हणून अकोला महानगरपालिकेत रुजू झाले आहे.परंतु अकोला महानगरपालिकेत आधीच प्रशासन अधिकारी असल्यामुळे तसेच अमरावती उप संचालक येथुन आलेले प्रशासन अधिका-र्यांना आयुक्तांनी रुजू कसे करुन घेतले ? म्हणजे दाल मे कुछ काला है असे यावरुन दिसत आहे?. अकोला मनपात आधीच प्रशासन अधिकारी असल्यावर टेकाडे यांची नियुक्ती व आयुक्त तथा प्रशासक यांची चुप्पी याबाबत अनेक तर्कवितर्क सुरु आहे. यामुळे शासनाने दोन दोन अधिकारी नियुक्त केल्याने पन यावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. सन 2012 च्या पदोन्नती झाली तेव्हा ही पदे पदोन्नती ने भरण्यात आली आहे. त्याबाबत शैकडो तक्रारी सुद्धा झालेल्या आहेत मात्र या पदोन्नती वर कठोर कार्यवाही आयुक्तांनी करण्याचे धाडस न केल्यामुळे कुठेतरी पाणी मुरत असल्याचे यावरुन दिसत आहे!. दुसरे प्रशासन अधिकारी आल्याने सर्व गोंधळ होत असल्याची चर्चा मनपा वर्तुळात सुरु आहे. या आधी शासनाच्या नियमानुसार प्रशासन अधिकारी हे प्रतिनियुक्ति वर महानगरपालिकेत येत होते. हे विषेश, सन. 2012 च्या जंपीग पदोन्नतीत आर्थिक घोळ करून प्रतिनियुक्ति वर असलेल्या पदावर जंपीग पदोन्नती करत कुली असलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याने जंपीग प्रकरण समोर आले होते. त्यामुळे पद एक आणी अधिकारी दोन याचा अर्थ दोन वेतनश्रेणी वर शासनाचा खर्च होत आहे या अधिका-र्याच्या वेतनावर लाखोची उधळपट्टी करण्यात येत आहे यावर लेखा आक्षेप निघाल्यास ही रक्कम कोण भरणार? आता शासनाने पुन्हा या पदावर प्रशासन अधिकारी नियुक्त केल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. आताआयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी ह्या बाबत काय निर्णय घेतात तसेच दोन अधिका-र्यांचा झालेला घोळ व जटील प्रश्न कसा सोडवतात हे पाहणे औस्तुक्याचे होईल.