दिग्रस खुर्द येथील घरकुल संबंधित विचारणा केली असता ग्रामसेवकांने दिली धमकी!
दिग्रस खुर्द येथील रहिवासी दीपक विश्वनाथ बरडे यांनी दिली ग्रामसेवकाच्या धमकी विरोधात लेखी तक्रार
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा -संपूर्ण महाराष्ट्र मधील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ,ग्रामपंचायत पंचायत समिती नगरपरिषद महानगरपालिका सध्या स्थिती त घरकुल योजना ही मोठ्या जोराने केंद्र सरकारच्या व राज्य सरकार लाभार्थ्यांसाठी योजना राबविण्यात येत आहे शासनाचे धोरण राज्यातील प्रत्येक गोरगरीब व दारिद्र्यरेषेखालील प्रत्येकाला घरकुलाचा लाभ मिळाला पाहिजे हे धोरण असून प्रत्येक विभागातील गाव खेड्यातील होणाऱ्या घरकुल संबंधित सर्वेक्षण करण्यात आले व ज्या लोकांच्या घरकुल संबंधित काही त्रुटी असतील तर त्या संबंधित त्यांना सूचना देऊन शासकीय नियमानुसार पूर्तता करण्याची वेळ सुद्धा नागरिकांना देण्यात आली परंतु घरकुल संबंधी अनेक नागरिकांना पायपीट सुद्धा करायची वेळ पातुर पंचायत समितीमध्ये दिसत आहे
पातूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दिग्रस खुर्द या गावात घरकुल यादी जाहीर करण्यात आल्या यादी मध्ये दिग्रस खुर्द रहिवासी दीपक विश्वनाथ बरडे यांनी ग्रामपंचायत संबंधित ग्रामसेवक पल्हाडे यांना विचारणा केली असता त्यांना ग्रामसेवकांनी उडवा उडवीची उत्तरे दिली अर्जदार दीपक बर्डे यांनी सदर लोकप्रतिनिधींच्या कानावर टाकली असता तू कशाला भेटलास चा आता तुझं घरकुल मंजूर होणार नाही तुझ्याकडून काय होते ते बघून घे असे शब्दात लाभार्थ्याला बोलले असल्याचे लिखित तक्रार लाभार्थ्यांकडून पंचायत समिती गटविकास यांना तक्रार दिली आहे ,
आता पंचायत समिती प्रशासन कुठल्या प्रकारचे कारवाही करते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहेत.