भिमराया घे तुझ्या लेकरांची वंदना ! बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी कँडल मार्च
पातूर : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज कँडल मार्च काढून अभिवादन करण्यात आले.
भिमजयंती सार्वजनिक उत्सव समिती पातूरच्या वतीने आज दि.६ डिसेंबर रोजी सकाळी पातूर शहरातील भिमनगर येथील आंबेडकर मैदानस्थित बाबासाहेबांच्या पुतळ्याला राष्ट्रगीत घेऊन मानवंदना देण्यात आली.त्यानंतर सायंकाळी पातूर शहरात कँडल मार्च काढून अभिवादन करण्यात आले.हा अभिवादनपर मार्च अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व शांततेत महात्मा फुले स्मारक संभाजी चौक येथून महात्मा फुलेंचे व बाबासाहेबांचे पूजन करू सुरू होऊन मिलिंद नगर,कासार वेटाळ,तेल पेठ,विठ्ठल मंदिरासमोरून गुजरी लाईन मार्गे महात्मा फुले नगर होऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले व बुद्धावंदना,भिमस्मरण घेतले त्यानंतर दोन मिनिटांचे मौन धारण करून श्रद्धांजली देऊन समारोप करण्यात आला.
या कँडल मार्च मध्ये पातूर शहरातील बौद्ध उपासक-उपासिका,शालेय विद्यार्थी तसेच आंबेडकर विचारधारेने प्रेरित सर्व समाजातील घटकांचा हजारोंच्या संख्येने सहभाग होता.यावेळी पातूर पोलिसांनी सदर कँडल मार्चला कुठल्याही प्रकारचा अडथळा होऊ नये याकरिता कँडल मार्च मार्गावरील वाहतूक दुसरीकडे वळविली व चोख बंदोबस्त ठेवला होता.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा