‘ओबीसी’ चे संविधानिक आरक्षण वाचविण्यासह ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी!
‘ओबीसी’ चे संविधानिक आरक्षण वाचविण्यासह ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, तसेच ओबीसींचे आरक्षण इतर समाजांना न देता, स्वतंत्र आरक्षण द्यावे यासह इतर मागण्यांसाठी ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश व अत्यल्प समाज संघटनेच्यावतीने आज अकोला क्रिकेट क्लब मैदानातून सकल ओबीसी मोर्चा काढण्यात आला. ओबीसींमधील विविध समाज संघटनांना सोबत घेऊन हा मोर्चा अकोला शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला.