अकोला महानगरपालिका मध्ये भाजपाच्या शेकडो कोटीच्या भ्रष्टकारभाराची शिवसेनेतर्फे पोल खोल !

अकोला महानगरपालिका मध्ये भाजपाच्या शेकडो कोटीच्या भ्रष्टकारभाराची शिवसेनेतर्फे पोल खोल !

मागील सहा वर्षापासून सत्ताधारी भाजपा व महापालिका तुमच्या-आमच्या खिशातून हजारो रुपयांचा टॅक्स वसूल करत आहे. भाजपा व मनपाने लागू केलेला टॅक्स नागपूर उच्च न्यायालयाने 2019 मध्ये रद्द केला होता. तरीही मनपा अवाजवी टॅक्स वसूल करत आहे. आणि आपण निमुटपणे पोटाला चिमटा देऊन टॅक्स जमा करत आहोत. सर्वसामान्य नागरिकांवर लादलेला हा टॅक्स रह करण्याच्या मागणीला भाजपाने केराची टोपली दाखवली आहे.

* मालमत्ता पुनर्मूल्यांकनाच्या नावाखाली महापालिका यावर्षी आपल्यावर पुन्हा टैक्स लादनार आहे. यासाठी आरखंड मधील स्वाती इंडस्ट्रीज एजन्सीसोबत पाच वर्षाचा करारनामा केला आहे.

* या एजन्सीला भाजपाच्या दबावामुळे नियुक्त करण्यात आले आहे. यात 50 कोटींचा मोठा भ्रष्टाचार झाला आहे.

* हीच एजन्सी अकोलेकरांच्या खिशातुन जबरदस्तीने, हुकूमशाहीरित्या टॅक्स, पाणीपट्टी, बाजार वसूली करत आहे ★ यासाठी एजन्सीला वर्षाकाठी चक्क 10 कोटी रुपये व पाच वर्षात 50 कोटी रुपये दिल्या जाणार आहेत.

* गम्मत म्हणजे हीच सर्व वसूली मनपा कर्मचारी योग्यरित्या करत असताना केवळ स्वाती एजन्सीच्या

माध्यमातून स्वतःचे स्वीसे भरण्यासाठी हा सर्व प्रकार केला जात आहे.

* मनपा कर्मचाऱ्यांनी 100 कोटी टॅक्स वसूल केला तर त्यासाठी मनपाला 3 कोटी रुपये खर्च येतो परन्तु

हाच 100 कोटींचा टॅक्स स्वाती कंपनीने वसूल केला तर मनपा प्रशासनाचे एक वर्षांत 8.50 कोटी रुपये खर्च होतात.

* अशावेळी आपण सर्व अकोलेकरांनी स्वाती एजन्सीकड़े टॅक्स, पाणीपट्टी जमा करु नका, एजन्सीने

दादागिरी केल्यास आमच्या शिवसेनेसोबत संपर्क साधा.

* शहरातील 50% नागरीक मनपाकड़े स्वतः टॅक्स जमा करतात. अशा वेळी स्वाती कंपनीला 8.50%

कमीशन कशासाठी द्यायचे असा प्रश्न उपस्थित होतो.

* मनपा प्रशासनाने स्वाती कंपनीला 8.50% कमिशन देण्याऐवजी अकोले करांना टॅक्समध्ये सूट
दररोज पाणी देण्याची घोषणा हवेत. 110 कोटी रुपयांचा चूराड़ा

★ ‘अमृत अभियान’ अंतर्गत अकोलेकरांना दररोज पाणीपुरवठा करण्याची घोषणा भाजपाने केली होती. यासाठी 110 कोटी रुपयांचा चुराडा केला. तरीही नागरिकांना पाच दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे.

* पाणीपुरवठा योजनेसाठी संपूर्ण शहरात खोदकाम केले. खोदलेल्या, तोड़फोड़ केलेल्या रस्त्याची दुरुस्ती केली नाही.

* रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली 12 कोटी रुपयांचे देयक लाटण्यात आले. हे देयक खिशात घालणारे व अकोलेकरांना खड्ड्यांचा त्रास सहन करायला लावणारे कोन, हे तुम्हीच ओळखा.

भूमिगत गटार योजनेत मोठा घोळ

‘अमृत अभियान’ अंतर्गत शहरातील लहान-मोठे नाल्यातील घाण सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी भूमिगत गटार योजना मंजूर झाली. त्यावेळी भाजपाने मोठा गवगवा केला होता.

★ योजनेवर 97 कोटी रुपये स्वर्च केल्यावरही सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट नदीत सोडल्या जात आहे. यामुळे प्रदूषण, दुर्गंधी व डासांची समस्या कायम आहे. भूमिगत गटार योजनेचे 97 कोटी कोणाच्या खिशात गेले, याचा तुम्हीच विचार करा.

सिमेंट रस्त्याची 4 महिन्यात लागली वाट

* सन 2017 मध्ये भाजपच्या कालावधीत शहरातील प्रमुख सिमेंट रस्त्याचे निर्माण करण्यात आले. यावर 22 कोटी रुपये खर्च झाला होता. रस्ते तयार केल्यावर चार महिन्यात रस्त्याची ऐशीतैशी झाली.

* या रस्त्यामध्ये मुख्य पोस्ट ऑफिस ते सिव्हिल लाईन चौक, दुर्गा चौक ते अग्रेसन चौक, टॉवर ते रतनलाल प्लॉट चौक, माळीपुरा ते लक्कडगंज रस्त्याचा समावेश आहे.

★ या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे अनेक निष्याप नागरिकांचे अपघात होऊन दुखापतग्रस्त झाले. भाजपाने कधीही रस्ते दुरुस्तीसाठी मनपाला निर्देश दिले नाहीत.

दररोज पाणी देण्याची घोषणा हवेत. 110 कोटी रुपयांचा चूराड़ा

★ ‘अमृत अभियान’ अंतर्गत अकोलेकरांना दररोज पाणीपुरवठा करण्याची घोषणा भाजपाने केली होती. यासाठी 110 कोटी रुपयांचा चुराडा केला. तरीही नागरिकांना पाच दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे.

* पाणीपुरवठा योजनेसाठी संपूर्ण शहरात खोदकाम केले. खोदलेल्या, तोड़फोड़ केलेल्या रस्त्याची दुरुस्ती केली नाही.

* रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली 12 कोटी रुपयांचे देयक लाटण्यात आले. हे देयक खिशात घालणारे व अकोलेकरांना खड्‌ड्यांचा त्रास सहन करायला लावणारे कोन, हे तुम्हीच ओळखा.

भूमिगत गटार योजनेत मोठा घोळ

‘अमृत अभियान’ अंतर्गत शहरातील लहान-मोठे नाल्यातील घाण सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी भूमिगत गटार योजना मंजूर झाली. त्यावेळी भाजपाने मोठा गवगवा केला होता.

★ योजनेवर 97 कोटी रुपये स्वर्च केल्यावरही सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट नदीत सोडल्या जात आहे. यामुळे प्रदूषण, दुर्गंधी व डासांची समस्या कायम आहे. भूमिगत गटार योजनेचे 97 कोटी कोणाच्या खिशात गेले, याचा तुम्हीच विचार करा.

सिमेंट रस्त्याची 4 महिन्यात लागली वाट

* सन 2017 मध्ये भाजपच्या कालावधीत शहरातील प्रमुख सिमेंट रस्त्याचे निर्माण करण्यात आले. यावर 22 कोटी रुपये खर्च झाला होता. रस्ते तयार केल्यावर चार महिन्यात रस्त्याची ऐशीतैशी झाली.

★ या रस्त्यामध्ये मुख्य पोस्ट ऑफिस ते सिव्हिल लाईन चौक, दुर्गा चौक ते अग्रेसन चौक, टॉवर ते रतनलाल प्लॉट चौक, माळीपुरा ते लक्कडगंज रस्त्याचा समावेश आहे.

★ या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे अनेक निष्याप नागरिकांचे अपघात होऊन दुखापतग्रस्त झाले. भाजपाने कधीही रस्ते दुरुस्तीसाठी मनपाला निर्देश दिले नाहीत

* सिटी कोतवाली ते रयत हवेली ते मनकर्णा प्लॉट सिमेंट रस्ता तयार केल्यावर दोन महिन्यात खड्डे पडले. यांसह विविध भागातील प्रमुख सिमेंट रस्त्याच्या कामात कोट्यावधीचा भ्रटाचार झाला आहे.

नाचे काम सहा महिन्यात कोसळला उड़ानपुल

* अशोक वाटिका चौक ते एसीसी मैदान पर्यंत तयार केलेल्या छटाकभर उड्डान पुलासाठी 276 कोटींचा स्वर्च करण्यात आला.

* केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उदघाटन केल्यावर केवळ सहा महिन्याच्या आत 15 डिसेंबर 2022 रोजी अशोका वाटिका येथील पुल कोसळला.

* मागील 11 महिन्यांपासून या पुलाचे दर्जाहीन बांधकाम सुरु आहे. निकृष्ठ बांधकाम विषयी आमच्या पक्षाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हाधिकारी व महापालिकेला वारंवार अवगत केल्यावरही भाजपच्या दबावामुळे कंत्राटदारावर कोणतीही कारवाई केली जात नाही. अकोलेकरांनो, यापेक्षा भ्रष्टकारभाराचा आणखी कोणता पुरावा हवा…

अकोलेकर घरकुलापासून वंचित

अकोला शहरातील 67000 पात्र लाभार्थीयां पैकी फक्त 7000 घरकुल मंजूर झाले असून त्यापैकी फक्त 1000

लाभार्थीयांनी घरकुल बांधकाम सुरु केले.

* अकोला महानगरपालिकेच्या जाचक अटीमुळे लाभार्थी घरकुल घेण्यास इच्छुक नाहीत

आजवर या शहरातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी भाजपाने एकही मोठा उद्योग किंवा प्रकल्प आणला नाही. श्रीमंतांनी आणखी श्रीमंत व्हावे अन गरीबांनी गरीब राहावे, हीच भाजपाची मानसिकता राहली आहे. तुम्ही सर्व अकोलेकर सुज्ञ आहात. तुमच्या मुलांचे भवितव्य लक्षात घ्या, महापालिकेकडून होणाऱ्या अन्यायाचा हिमतीने, ताकदीने सामना करा. तुमच्या हक्काचा लढा लढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या शिवसेनेला साथ द्या असे आव्हान यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news