एल. आर. टी. च्या एन. सी. सी. कैडेट्सचा रक्तदानासाठी उत्कृष्ठ पुढाकार
दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी, अकोला द्वारा संचालित श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिशन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथील एन. सी. सी. युनिटच्या कॅडेट्सनी रक्तदानासाठी उत्कृष्ट असा सहभाग नोंदविला. ११ महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. अकोलाचे कमांडींग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सी. पी. भदोला यांच्या मार्गदर्शनाखाली या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ११ महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. अकोलाच्या प्रांगणात छात्र सैनिकांनी रक्तदान करुन देश व समाजाप्रति कर्तव्य बाजविले. ११ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सी. पी. भदोला यांनी एन. सी. सी. कॅडेट्सच्या मनात रक्तदान विषयी असणारी भिती दुर करून, शहिद शुर विरासाठी ही आदरांजली आहे असे मत व्यक्त केले. तसेच श्रीमती एल. आर. टी. कॉलेजचे एन. सी. सी. ऑफिसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांनी आपले मत मांडताना, रक्तदान हे श्रेष्ठदान आहे व रक्ताचा हॉस्पिटल मध्ये भासत असलेला तुटवडा अश्या शिबीरामार्फत तो आपण पूर्ण करु शकतो. समाजाचे ऋण फेडण्याची ही सुवर्णसंधी आहे.
असे कॅडेट्सला त्यांनी पटवून दिले. एच. डि. एफ. सी. बँक आणि साई जीवन ब्लड बँक यांचे या शिबिरासाठी महत्त्वाचे योगदान लाभले. या रक्तदान शिबिर मध्ये सिनीयर अंडर ऑफिसर ऋषिकेश पटेल, जूनियर अंडर ऑफिसर सागर वानखडे, जूनियर अंडर ऑफिसर वैष्णवी ढेमरे, सार्जेंट तनाया नाफडे, कॅडेट सिमरन इंगळे, कॉर्पोरल नैना टोंगळे, कॉर्पोरल आदित्य वाकोडे, कॅडेट यशवंत हरसूलकर, कॅडेट गुणवंत गुजर, कॅडेट समर्थ दुबे, कॅडेट रोहन मुरादे, कॅडेट प्रेम अहिर यांनी रक्तदान केले. त्याच्या या कार्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. सिकची तसेच दि. बी. जी. ई. सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंहजी मोहता, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. विजयकुमारजी तोष्णीवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष इंजि. अभिजितजी परांजपे, मानद सचिव श्री. पवनजी माहेश्वरी, सह सचिव सी. ए. विक्रमजी गोलेच्छा व समस्त माननीय कार्यकारी सदस्यांनी त्याचे अभिनंदन केले आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.