भारतीय जनता पक्षाच्या वतीने काँग्रेस व प्रियांक खडके व त्यांच्या समर्थन देणाऱ्यांचा निषेध पुतळा दहन!
अकोला सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्याचा काँग्रेसने चंग बांधला आहे त्याला साधा निषेध सुद्धा स्वतःला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारसरणीचा पक्ष म्हणून घेणाऱ्या उबाठासेना साधा विरोध करत नाही सत्तेसाठी हिंदुत्वाचा पदोपती अपमान करणाऱ्यांसोबत तसेच हिंदुस्थानातील राष्ट्रभक्तांचा मान भारतीयांचा अपमान करण्याची परंपरा काँग्रेसची असून त्यांच्या सोबत असणारे यांची सुद्धा केवळ मोदी भाजप द्वेष गल्ली ते दिल्ली पर्यंत असल्यामुळे अशा तत्वांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा जिल्हा भाजपा अध्यक्ष किशोर मागटे पाटील यांनी दिला. कर्नाटक मधील मंत्री व काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांचे सुपुत्र प्रियांक खडगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी हा शब्द वापरल्या निषेधार्थ आज महाराष्ट्रभर भारतीय जनता पक्षाच्या वतीने काँग्रेस व प्रियांक खडके व त्यांच्या समर्थन देणाऱ्यांचा निषेध पुतळा दहन स्थानिक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले नाट्यगृह लोकनायक जयप्रकाश नारायण चौक इथे अकोला भाजपा महानगर व अकोला तालुका तर्फे प्रियांक खडगे व त्यांना समर्थन देणाऱ्यांचे पुतळ्याचे दहन करण्यात आले.