पातुरच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली अवकाश यात्रा

पातुरच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली अवकाश यात्रा

किड्स पॅराडाईज मध्ये अभिनव उपक्रम

पातूर : येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल येथील विद्यार्थ्यांनी अवकाश यात्रा अनुभवली. या अवकाश यात्रेच्या माध्यमातून सौर मालिकेचा अभ्यास सोप्या पद्धतीने करण्याचा अनुभव यावेळी विदयार्थ्यांनी घेतला.

पोलाद स्टील यांचे वतीने शालेय विद्यार्थ्यांना सौर मंडळ आणि चांद्रयान बाबत माहिती देण्यासाठी उपक्रम रावविण्यात येत आहे. त्यानुसार फिरते अत्याधुनिक थ्रीडी थेटर व्दारे शालेय विद्यार्थ्यांना अवकाश यात्रेचा आनंद देण्याचा अनुभव मिळत आहे. या उपक्रमद्वारे विदयार्थ्यांना ग्रह, तारे, पृथ्वी सोबतच चांद्रयान याबाबत सखोल माहिती देण्याचा अभिनव उपक्रम सुरु आहे. नुकतेच पातुरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल येथे हा अभिनव उपक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे, कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेणारे शाम गाडगे, योगेश चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, नरेंद्र बोरकर, बजरंग भुजबळराव, अविनाश पाटील, हरीश सौंदळे, रविकिरण अवचार, नीतू ढोणे, प्रियंका चव्हाण, योगिता देवकर, नयना हाडके, लक्ष्मी निमकाळे, तृप्ती पाचपोर, निकिता भालतिलक, प्रीती धोत्रे, प्रीती हिवराळे, शितल जुमळे, अश्विनी वानेरे, शानू धाडसे , रूपाली पोहरे, शुभम पोहरे यांनी परिश्रम घेतले.

किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news