आमदार ॲड.आकाशदादा फुंडकर यांच्या सूक्ष्म नियोजनाचे फलीत !

आमदार ॲड.आकाशदादा फुंडकर यांच्या सूक्ष्म नियोजनाचे फलीत !

भोपाळ आणि बऱ्हाणपूर विधानसभेच्या उमेदवारांचा दणदणीत विजय

ज्या जागांची होती जबादारी तेथे मोठ्या मताधिक्क्याने उमेदवार झाले विजय

खामगाव:-देशात पांच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचे अनेक चेहरे चांगलेच झळकले आहेत. या राज्यांची जबाबदारी वेगवेगळ्या पक्षाने महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांवर सोपवली होती. यात सर्वात महत्त्वाचा असलेल्या मध्यप्रदेश मधील बऱ्हाणपूर आणि भोपाळ या विधानसभेची जबाबदारी खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड. आकाशदादा फुंडकर यांच्यावर होती. या क्षेत्रांच्या निकालाने त्यांच्या मेहनतीला फळ दिले आहे. आमदार ॲड. फुंडकर यांच्या सूक्ष्म नियोजनाने दोन्हीही जागांवर भाजपच कमळ फुलले आहे. मध्यप्रदेश मध्ये भारतीय जनता पक्षाने पूर्ण बहुमत मिळवले आहे. भाजप यंदा पाचवांदा सत्ता स्थापन करणार आहे. पण, त्यांच्यासाठी हा विजय खेचून आणणं सोपं नव्हतं. भाजपनं योग्य रणनीती आखत विरोधात असलेलं वारं स्वतःच्या दिशेला वळवून घेतलं. विधानसभेच्या २३० पैकी १६३ जागा भाजपने जिंकल्या आहेत, तर काँग्रेसला केवळ ६६ जागा मिळाल्या. या सर्वांमध्ये भारतीय जनता पार्टीने मध्य प्रदेशातील महत्त्वाच्या असलेल्या बऱ्हाणपूर आणि भोपाळ विधानसभेची सूत्रे खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड.आकाशदादा फुंडकर यांच्याकडे “विधानसभा प्रभारी” म्हणून दिली होती पक्षाने आदेश देताच आमदार ॲड. फुंडकर हे मध्य प्रदेश मध्ये तळ ठोकून होते. प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीचे नियोजन, नाराज असलेली पक्षांतर्गत मंडळींची मनधरणी आणि विरोधकांच्या प्रचार नियोजनाला भेदत सूक्ष्म नियोजन करून त्यांनी विजय खेचून आणला. यामध्ये बऱ्हाणपूर मध्ये श्रीमती अर्चना चिटणीस यांनी काँग्रेस उमेदवार ठा,सुरेंद्र सिंह उर्फ शेराभैया यांचा 31171 मतांनी पराभव केला. तर भोपाळ (गोविंदपूरा) विधानसभा मतदार संघात भाजपच्या श्रीमती कृष्णा गौर यांनी काँग्रेसच्या रविंद्र साहू यांचा पराभव करीत विक्रमी १ लाख ६ हजार ६६८ मतांनी विजय मिळविला. वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात आमदार ॲड.आकाशदादा फुंडकर यांनी योग्य रणनीती आखलीच सोबतच या दोन्ही मतदार संघातील स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांनी देखील मेहनत घेतली. या दोन्ही जागांच्या विजयाचे श्रेय आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी उपरोक्त़ दोन्ही मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाला दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news