प्रतिष्ठेचा डॉ. आंबेडकर नॅशनल पुरस्काराने गजानन हरणे दिल्ली येथे सन्मानित.
अकोला – स्थानिक जिल्हा परिषद नगर खडकी अकोला येथील समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जण आंदोलन, व मराठायोद्धा गजानन ओंकारराव हरणे यांना दिल्ली येथे 2023 चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल अवॉर्ड पुरस्कारा सनमानचिन्ह गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. गजानन हरणे हे गेल्या 30 वर्षापासून विविध सामाजिक संस्था संघटनेच्या माध्यमातून गोरगरीब, दिन दलित, दिव्यांग, वंचित लोकांसाठी शाहू फुले आंबेडकर गाडगे महाराज तुकडोजी महाराज यांचे विचार घेऊन सेवाभावी वृत्तीने काम करीत आहेत. त्यांच्या या समर्पित त्याग भावनेने काम करण्याच्या कार्याची दखल घेऊन आज पर्यंत शंभरच्या वर पुरस्कार भारत सरकार, राज्य शासन ,विविध सामाजिक संस्था संघटनेच्या वतीने त्यांना गौरवण्यात आले आहे. नुकताच दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमी यांच्यावतीने 39 व्या राष्ट्रीय दलित साहित्यकार सामाजिक संमेलनात पंचशील आश्रम दिल्ली येथे गजानन हरणे यांना सन्मानाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल अवार्ड देऊन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत व शुभ हस्ते गौरवण्यात, सन्मानित करण्यात आले. हा प्रतिष्ठेचा मानाचा नॅशनल राष्ट्रीय सन्मान मिळाल्याबद्दल विविध सामाजिक संस्था संघटनेचा वतीने आनंद व्यक्त केला जात असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्रकाशनार्थ..