‘विकसित भारत संकल्प यात्रे’त ‘आयुष्मान भारत कार्डा’चे वाटप

‘विकसित भारत संकल्प यात्रेत आयुष्मान भारत कार्डा’चे वाटप

विविध गावांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रसारण

अकोला, दि. ११ : ‘विकसित भारत संकल्प यात्रे’द्वारे  रथ जनजागृती करीत असून,  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विविध गावांत प्रसारण करण्यात आले.

यात्रेच्या माध्यमातून आरोग्य तपासणी व आयुष्मान भारत कार्डाचे वाटप गावोगाव होत आहे. यात्रेनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे विविध राज्यांतील लाभार्थ्यांशी शनिवारी संवाद साधला. यानिमित्त अकोला जिल्ह्यातील डोंगरगाव, मुंडगाव, शिरसो, खेल सटवाई या गावांमध्येही कार्यक्रम झाला. प्रधानमंत्र्यांच्या संदेशाचे प्रसारण ठिकठिकाणी करण्यात आले.

जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी. हे डोंगरगाव येथील कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन संदेशानंतर जिल्हाधिकारी श्री. कुंभार व श्रीमती वैष्णवी बी. यांनी नागरिकांशी संवाद साधला. शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली..

विविध गावांमध्ये आरोग्य तपासणीही करण्यात आली. नागरिकांच्या टीबी, सिकलसेल यासह विविध आजारांसंदर्भात रक्त तपासण्या करण्यात आल्या, तसेच आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिका-यांनी कृषी विभागाच्या ड्रोन प्रात्यक्षिकाचेही अवलोकन केले.

केंद्र शासनाच्या अनेक फ्लॅगशिप योजनांपासून अजूनही काही लाभार्थी वंचित आहेत. या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना योजनांची माहिती व लाभ देण्यासाठी संपुर्ण देशभर हा उपक्रम राबविला जात आहे. समाजातील सर्वच घटकातील वंचित लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी राबविण्यात येत असलेली ही मोहिम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा. जास्तीत जास्त लाभार्थ्यांना उपक्रम काळात लाभ देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी अधिका-यांना केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news