आ.पडळकर यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा समता परिषदेने केला निषेध
अकोला :- विधान परिषद सदस्य, धनगर समाजाचे तथा ओबीसी नेते मा.आ.श्री गोपीचंद पडळकर यांच्यावर काल इंदापूर येथे आपल्या कार्यकर्त्यांना भेटण्याकरता गेले असता, त्यांच्यावर काही अज्ञातांनी भ्याड हल्ला केला. ओबीसी नेते मा.आ. गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर तातडीने कार्यवाही करावी. अशा स्वरूपाचे निवेदन समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष प्रा. तुकाराम बिडकर यांच्या मार्गदर्शनात अखिल भारतीय समता परिषद अकोला जिल्हा (ग्रामीण व महानगर) झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करून शासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. सदाशिव शेळके महानगराध्यक्ष प्रा श्रीराम पालकर समता परिषदेचे जिल्हा महासचिव अनिल मालगे, प्रा.अशोक भराड, प्रा. दिलीप अप्तुरकर,रामदास खंडारे,शासनाला निवेदन करून झालेल्या प्रकरणाचा निषेध करण्यात. पुन्हा असे प्रकार होऊ नये याकरिता शासनाने वेळीच योग्य त्या उपाययोजना कराव्यात.असे शासनाला समता परिषदेच्या वतीने या निवेदना द्वारे निवेदन करण्यात येत आहे.