शासनाने बंदी घातलेल्या पस्टीकचा साठा ठेवल्याने व्यावसायिकावर मनपाव्दारा दंडात्मक कारवाई.
अकोला दि. 11 डिसेंबर 2023 – अकोला महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्या आदेशान्वये तसेच मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांच्या सुचनेनुसार शासनाने बंदी घातलेल्या प्लस्टीक बाबत आज दि. 11 डिसेंबर रोजी मनपा उत्तर झोन अंतर्गत जुने कॉटन मार्केट येथील किराणा बाजारातील व्यावसायिकांची तपासणी केली असता गुरूनानक ट्रेडर्स येथे शासनाने बंदी घातलेल्या प्लस्टीकच्या वस्तुंचा साठा आढळल्यांने त्यांच्या कडील असलेला साठा जप्त करून त्यांच्यावर रूपये 5 हजाराची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाई उत्तर झोन सहा.आयुक्त विठ्ठल देवकते यांच्या मागदर्शनात करण्यात आली असून यावेळी उत्तर झोन क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक अब्दुल सलीम शेख ईस्माइल, रौशन अली, मोहम्मद आसिफ, मोहम्मद अलीम, जोगेंद्र खरारे, जितेंद्र गोराने, बॅन्उवाल आदिंची उपस्थिती होती.