पातुर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या राहेर ग्रामपंचायत मध्ये महिला सदस्य दोन पदावर! 

अबब एकच व्यक्ती दोन पदावर! 

पातुर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या राहेर ग्रामपंचायत मध्ये महिला सदस्य दोन पदावर! 

शासनाची दिशाभूल पदांचा मानधनाचा लपेटा..

पातूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती (ICRP) पद व ग्रामपंचायत सदस्य पद हे दोन पद राहेर या ग्रामपंचायत मधील एक महिला सदस्य उपभोगत आहे, दोन पदावर कार्यरत आहे या पदाचे मानधनाचा लपेटा ग्रामपंचायत सदस्य मारत आहे अशी तक्रार राहेर आडगाव सरपंच विजय दिनेश पाचपोर यांनी पंचायत समिती अधिकारी अगडते यांना निवेदनाद्वारे केली आहे या सदस्य महिलेचे सदस्यत्व रद्द करा अन्यथा आयसीआरपी या पदावरून दूर करा अशी मागणी निवेदनात केली आहे व गेल्या दोन-तीन वर्षापासून या पदाची मानधन रिकवरी करा अशी सुद्धा मागणी सरपंच यांनी केली आहे सरपंच यांनी आरोप करत या महिला सदस्याने शासनाची दिशाभूल केली आहे सदर महिलेचे सदस्यत्व पद रद्द करून ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कार्यात असलेल्या पदाच्या मानधनाची रिकवरी करण्यात यावी व कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी याकरिता गटविकास अधिकारी पातुर यांना निवेदन देण्यात आले आहे तसेच दोन्ही पदांचा गैरफायदा घेऊन राहेर ग्रामपंचायत मध्ये सदस्य पद उपभोगत असलेल्या महिलावर काय कारवाई होते याकडे ग्रामपंचायतचे लक्ष लागले आहे .

किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news