राज्य सरकारच्या विरोधात बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ची उग्र निर्दशने!
अकोला मनपा आयुक्त करत आहे बहुजनावर अन्याय!
बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया संघटना आक्रमक
नागपूर:-नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु असल्यामुळे महाराष्ट्रातील असंख्य अन्यायग्रस्त,शोषित, बहुजन वर्ग यांचे आंदोलन यशवंत स्टेडियम धंतोली येथे सुरु आहे. आपल्या मागण्या संदर्भात आंदोलन करित आहेत परंतु या राज्य सरकार यांच्या मागण्यावर लक्ष देत नसल्यामुळे हे शिंदे सरकार फक्त उदघाटन समारंभात मशगुल असल्याचे चित्र दिसत आहे.
यांच्या आंदोलनात सहभागी असलेल्या अन्यायग्रस्तावर लक्ष देण्यासाठी सरकारला वेळ नसल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया व्दारे चार प्रमुख मागण्यांचे निवेदन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना दिले आहे. त्यांनी आमच्या मागण्याची दखल घेतली असुन सभागृहात पटलावर मांडण्याची ग्वाही दिली आहे. तसेच विधान परिषद सदस्य मा.किरण सरनाईक यांनी सुध्दा आंदोलन सभा मंडपास भेट देऊन आपला प्रश्न उपस्थित करून येणाऱ्या विधान परिषद मध्ये ही उपस्थित करणार आणी अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे बोलुन दाखवले आहे. या मागण्या मध्ये प्रमुख मागणी आहे ती अकोला महानगरपालिकेच्या जंपीग पदोन्नती वर आक्षेप घेत जंपीग घेतलेल्या अधिका-र्यांवर कार्यवाही करा. शासनाला कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्याना शासन पाठिशी का घालत आहे? ड्रायव्हर ला जगात कुठेही पदोन्नती नाही परंतु अकोला मनपाने पदोन्नती देऊन शासनाची फसवणूक केली आहे.इलेक्ट्रानिक्स सर्टिफिकेट वाला इलेक्ट्रिक अभियंता, आस्तित्वात नसलेली पदे शासन मॉडेल मध्ये हेरफेर करुन भरण्यात आली. यामध्ये सेवाजेष्ट कर्मचाऱ्यांना डावलून पदोन्नती करण्यात आली ह्या पदोन्नती ला पंधरा वर्षापासून शासनाची अद्यापही मंजुरी नाही तरीही पदोन्नती घेतलेले अधिकारी गब्बर होत आहे.शासनाची फसवणूक करत आहे. दुसऱ्या मागणीत अकोला मनपा आयुक्त आयुक्त कविता व्दिवेदी यांच्या हिटलरशाही वागणुकी मुळे दोष नसतांना बहुजन कर्मचाऱ्यांवर अन्याय करुन खोट्या चौकशा लावून कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. तसेच संबंधित चौकशी अधिकाऱ्याकडे पुरावे नसताना कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. संबंधित चौकशी अधिकाऱ्याकडे सहा प्रकरणे असायला हवी मात्र सबंधित चौकशी अधिकार्याकडे 14 प्रकरणे देण्यात आली आहे. अशा आयुक्तावर चौकशी लावून कठोर शिक्षा तसेच हकालपट्टी करण्यात यावी.तसेच सविंधानाचे जनक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जनतेसाठी समान लोकहितासाठी संविधान निर्माण केले त्या संविधानास शासनाचे नेते मंत्री पदाधिकारी आणि प्रशासनाचे अधिकारी नियम पायदळी तुडवत आहे. दुर्लक्ष करित आहेत अन्याय करीत आहे. . या मागणी करिता बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया व्दारे नागपुर येथे हिवाळी अधिवेशनात आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये फेडरेशन चे केन्द्रीय अध्यक्ष राजकुमार जवादे, राज्याध्यक्ष शेषराव रोकडे, राज्य सचिव नरेश मुर्ती, प्रा.कांबळे सर , रविंद्र गेडाम,नागपुर शहर अध्यक्ष संजय शिंगाडे,संजय पडघामोल,राष्ट्रपाल गोंडाने, अकोला जिल्हा अध्यक्ष प्रकाश बोदडे, सचिव सुनील इंगळे
किशोर सोनटक्के, प्रकाश फुलउंबरकर,अम्बेश श्रिवास्तव,चिमणकर, राजहंस वंजारी,सुनिता चिरकोलू आंदोलनात सहभागी आहेत.