इसवी सन 16 शे पासुन भारतीय पुरातन वस्तूचा संग्रह पातुर शहरात प्रदर्शनी
पुरातन वस्तूचा छंद जोपासुन संग्रह निर्माण करणारे पातुर शहरातील एकमेव संजय गाडगे.
पातूर शहरातील संभाजी चौक येथील गाडगे वाडी येथे गेल्या तीन-चार शतकापासून पुरातून काळातील वस्तू व भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे हा संग्रह असून भारतीय लोककलेतून व जीवन वैशिष्ट्ये ,संसारीक वस्तू आज या वस्तूंचा संग्रह जोपासून प्रदर्शनी पद्धतीने मांडण्यात आले या संग्रहालयामध्ये दगडी हौद, बैल डमनी, अकरा पत्र्यांच्या तुकड्यांपासून बनवलेली अखंड कढई, धान्य कोटी, पुरातन टेलिफोन पुरातन कॅमेरे ,सलून साहित्य, सुतारी अवजारे, पुरातून कुलूप, प्राचीन ड्रिल मशीन, स्वयंपाक संबंधित पावशीचे प्रकार, फोर इन वन पावशी, पुरातन अदली शेह , वजन काटे, अखंड काचेच्या बोटेलमध्ये विणलेली बाज, लोणी यंत्र भरणी, पुरातन दिव्यांचे प्रकार , पितळीच्या पासून बनलेले पुरातन भांडे, पानपुड्यांचे मोर, बदक ,कार आकारांची आकर्षक पान पुढे, पुरातन ग्राम फोन पुरातन संगीत साधने, शेती उपयोगी असलेले जुन्या काळातील अवजारे , अठराशे शतकातील माचिस वस्तूंचा संग्रह जोपासून प्रदर्शनी ठेवण्यात आली आहे खरोखर या वस्तूंना बघितल्यानंतर डोळ्यांची पारणे फेडणारी या वस्तू नवीन पिढीने कधी न बघितलेल्या अशा या वस्तू शाळकरी विद्यार्थ्यांनी व नवीन पिढीतील तरुण युवकांनी या वस्तू बघून भारतीय संस्कृती व जुन्या काळातील राहणीमान या वस्तूंना बघितल्यानंतर आधुनिक युगातील नवीन पिढीला अभ्यास करणे योग्य ठरेल या वेळी प्रदर्शनीचे उद्घाटन पातुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पत्रकार उमेश देशमुख, मोहन जोशी, कुदूस शेख, छोटू काळपांडे, गोपाल बदरके , किरण कुमार निमकंडे, प्रमोद कढोणे, प्राध्यापक विलास राऊत, रमेशराव काळपांडे , प्रा मदर सर, चंद्रकांत अंधारे, सचिन बारोकार, निलेश गाडगे, राहुल भगत, राज पांडे, विजय नावकार, संजय गिरे, विवेक धरमकर, वसंता दुरोडकर, यांची उपस्थिती होती
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा