जुनी पेन्शन सह विविध मागण्यासाठी,राज्य कर्मचारी बेमुदत संपावर!
पातुर राज्यातील 1 नोव्हेंबर २००५ नंतर सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या व इतर मागणीसाठी गत वर्षी राज्यात आंदोलन छेडले होते, दरम्यान शासनाने दखल घेऊन समिती स्थापन केली होती, या समितीने शासनास अहवाल सादर केला आहे, त्या पार्श्वभूमीवर राज्यातील कर्मचारी आशेने बघत असताना, कुठलाही निर्णय शासनाने घेतला नाही, अखेर १३ डिसेंबर रोजी राज्यातील लाखो कर्मचारी नागपूर येथील अधिवेशनावर धडकले होते, शासनाने सदर विविध कर्मचारी संघटनेचे पदाधिकार्यांची संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती, परंतु या बैठकीत कुठलाही निर्णय शासनाने घेतला नाही, त्यामुळे अखेर दिनांक १४ डिसेंबर पासून आपल्या हक्काच्या जुनी पेन्शन सह इतर मागणीसाठी राज्य कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले आहेत, दरम्यान अखिल भारतीय राज्य कर्मचारी महासंघ या बेमुदत संपात सहभागी झाले आहे ,तर अकोला जिल्हातील महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने सुध्दा विभागीय सचिव अशोक वानखडे, डॉ उल्हास मोकळकर, नंदकिशोर चिपडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जुन्या पेन्शन सह विविध मागण्यासाठी बेमुदत संपात सहभागी झाले आहेत.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा