अश्लील व्हिडिओ बनवून यू ट्यूब वर टाकून वस्त्रहरण करणाऱ्या त्या महिलेवर गुन्हा दाखल करा अन्यथा कुटुंबासह आत्महत्या करेल!

अश्लील व्हिडिओ बनवून यू ट्यूब वर टाकून वस्त्रहरण करणाऱ्या त्या महिलेवर गुन्हा दाखल करा अन्यथा कुटुंबासह आत्महत्या करेल!

पिडीत महिलेची पत्रकार परिषदेत दिली माहिती

अकोला. समाज माध्यमांद्वारे समाज परिवर्तन करण्यासाठीं यू ट्यूब वर चानेलस चालु करुन पत्रकारिता करणाऱ्यांचे सध्या पिक आले आहे. मात्र याच समाज माध्यमांवर यू ट्यूब चॅनल्स वर मुलाखती लाईव्ह दाखवुन सकारात्मक पत्रकारिता दाखवणाऱ्या माधुरी सखी मंच द्वारा महिलांचे अश्लील व्हिडिओ टाकून लोकप्रियता मिळवण्याबरोबरच महिलांचे वस्त्रहरण करणाऱ्या त्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा महिनाभरानंतर मी कुटुंबासह आत्महत्या करणार असुन यासाठी ती महीला आणि तिच्यावर कारवाई न करणारे पोलिस जबाबदार असतील अशी माहिती अकोला जिल्हयातील एक पिडीत महिलेने पत्रकार परिषदेत दिली आहे.

अकोला जिल्हयातील रहिवाशी एक महिला नाशिक येथुन चालावीले जाणाऱ्या माधुरी सखी मंच या नावाचे यू ट्यूब चॅनल्स ची बळी ठरली आहे. असेच प्रकार त्या चॅनल्स चालविणाऱ्या महिलेने महाराष्ट्रातील अनेक महिलांसोबत केले आहे. त्यापैकी काहींनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तशीच तक्रार अकोला जिल्हयातील अकोट पोलिस ठाण्यात दिली आहे मात्र गेल्या ३ते ४महिन्यांपासून पोलिसांनी त्या महिलेवर कारवाई केली नाही. त्यामुळें तिच्याकडून अश्लिल व्हिडिओ यू ट्यूब वर अपलोड करणे सूरू आहे. त्याला कंटाळून त्या पिडीत महिलेचा पती याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असुन त्याचेवर अकोला येथे. जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचार सध्या सूरू आहेत असेही आज पिडीत महिलेने सांगीतले. त्यामुळें त्या महिलेच्या ओळखीच्याच महिलांना अश्लील व्हिडिओ टाकून त्यांचे समाज माध्यमांवर वस्त्रहरण करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करावा अन्यथा मी सह कुटुंब आत्महत्या करणार असुन त्याला जबाबदार ती महिला व पोलीस असणार असल्याचे तिने आज पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी यवतमाळ येथील एक पिडीत महिला उपस्थित होती. तिनेही तिच्याबाबत अश्लील चाट केल्याच्या झेरॉक्स प्रती दाखवल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news