अकोला पंचायत समिती यांचा अजब कारभार मनरेगा मधील भ्रष्टाचाराची चौकशीचा बनाव॥
अकोला जिल्हा परिषद co तथा उपजिल्हाधिकरि मनरेगा अकोला यांचे आदेश नुसार मजलापूर ग्रामपंचायत मध्ये मनरेगा च्या कामाची चौकशी पंचायत समिती अकोला येथील अधिकारी यांनी चौकशीचा बनाव करून चौकशी केलीच नाही॥तक्रारदार यांच्या म्हणणं आहे चौकशी माझ्या समोर करा परंतु मुजोर चौकशी अधिकारी ऐकायला तयार नाही ॥
अकोला महाराष्ट्र राज्यातील अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील मजलापूर ग्रामपंचायतमध्ये मनरेगाच्या विविध कामात बोगस मजूर दाखवून चक्क शासनाला लाखों रुपयाचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. एवढेच नाही तर शासनाच्या मनरेगा योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या ह्या महाभागांनी चक्क 350 झाडाचे 1600 झाडे दाखवून लाखों रुपये उचलून गंडा घातल्याचे उघड झालंय. मजलापूर कब्रिस्तान ते मैसाग रोडवर हे झाडे दाखविण्यात आले. या प्रकरणी अकोला जि प मुख्यकार्यकारी अधिकारी व अकोला उपजिल्हाधीकरी यांनी चौकशीचे आदेश दिले॥या प्रकरणा मध्ये पोलिसात रोजगार सेवक आणि इतर जणांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत असे तक्रार प्रकाश डोंगरे व आसिफोद्दिन यांनी केली.
अकोला तालुक्यातील मजलापूर येथे मनरेगा कामावर बोगस मजूर दाखवून शासनाच्या लाखो रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आले आहे.
या बोगस मजूर दाखवणाऱ्या व लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या या महाभागांनी मजुरांच्या यादीत गावातील गरीब लोकांची नावे टाकून बिले उचलण्यात आली आहेत. अशा प्रकारे गावभरातील नागरिकांची नावे मनरेगा मजूरांच्या यादीत टाकून लाखो रुपये उचलल्याची बिले आता ग्रामस्थांच्या माथी मारण्यात आली आहेत.परंतु या प्रकरणात अकोला पंचायत समिती येथील चौकशी अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले होते. आज दिनांक 15/12/2023 रोजी सकाळी 11 वाजता पथक चौकशी साठी आले परंतु चौकशी न करता त्यांनी दप्तर गुंडाळले. तक्रारदार प्रकाश डोंगरे यांना चौकशी अधिकारी यांनी झाडे आम्ही मोजून आलो असे सांगितले.
तक्रारदार समोर चौकशी करणे अनिवार्य होते परंतु तसे ना करता त्यांनी चौकशी केली. या भ्रष्टाचारामध्ये पंचायत समिती अकोला येथील मोठे मासे सहभागी असल्याचे बोलल्या जात आहे. या सादर प्रकरणाचा एक ग्रामस्थांनी व्हीडिओ चित्रीकरण केले. तो व्हीडिओ शोषल मीडिया वर प्रचंड वायरल झाला आहे. आता या प्रकरणावर काय होते संपून अकोला जिल्ह्याचा लक्ष आहे.