डाबकी रोड उड्डाणपुलाच्या ठेकेदारावर तत्काळ कार्यवाही करा ! – भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्य डॉ. अशोक ओळंबे पाटील यांची मागणी
अकोला – महाराष्ट्र राज्य तथा केंद्र शासनातर्फे करोडो रुपयांचा निधी डाबकी रोड येथील उड्डानपुलाकरिता देण्यात आला आहे. मात्र, ठेकेदाराने यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करुन अत्यंत निकृष्ट दर्जाचे उड्डानपुलाचे काम केल्याचे निदर्शनास येत आहे.
सर्वसामान्य जनते च्या घामाच्या असलेल्या करोडो रुपयांमधून निर्मित केलेल्या व उड्डानपुलामध्ये केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी ठेकेदारावर तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी भाजपा प्रदेश कार्यकारीणीय सदस्य डॉ. अशोक ओळंबे पाटील यांनी केली आहे.
उड्डानपुलाच्या बांधकामा मध्ये निकृष्ट दर्जाचे कार्य करण्यात आलेले असून त्यामध्ये वापरलेले डांबर हे निकृष्ट दर्जाचे वापरलेले असल्यामुळे उड्डानपुलाच्या सुरुवातीलाच डांबर उखडून त्याखालील मुरुम वर येत असल्याचे निदर्शनास येत आहे.
अवघ्या एक महिन्याआधीच हा उड्डानपुल पूर्णत्वास येऊन सुरु करण्यात आलेला आहे. एका महिन्यात जर उड्डानपुलाचे हे हाल होत असतील तर त्या पुलाची काय गॅरंटी? कारण
कोणताही उड्डानपुल बनवतांना त्याकरिता ठेके दाराकडून निश्चित कालावधीक रिता उड्डानपुलाच्या कामाकरिता गॅरंटी ही ठेकेदाराकडून लिहून घेण्यात येत असतांना सुद्धा ठेकेदार अश्या प्रकारचे निकृष्ट दर्जाचे कार्य करीत असल्यामुळे हा सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी एक प्रकारचा खेळ ठेकेदार करीत असल्यामुळे त्याच्यावर कार्यवाही होणे हे क्रमप्राप्त असल्यामुळे त्याच्यावर तत्काळ कार्यवाही
करण्याची मागणी सुद्धा करण्यात येत आहे.
तसेच या प्रकरणी डाबकी रोड येथील एका स्थानिक नागरीकांशी संपर्क साधला असता डाबकी रोडकडे येणाऱ्या स्स्त्याने नागरीकांना उड्डान पुलावर चढता किंवा उतरता येत नसल्यामुळे हा उड्डानपुल डाबकी रोड वासीयांकरिता केवळ शोभेची वस्तु ठरली असल्याची प्रतिक्रिया सुद्धा या नागरीकाने बोलुन दाखविली आहे.