अकोला क्षेत्रातील कॅफेवर मनपा आणि पोलीस प्रशासनाव्दारे सीलची कारवाई. .
अकोला दि. 15 डिसेंबर 2023 – अकोला महानगरपालिका क्षेत्रातील पुर्व झोन अंतर्गत जवाहर नगर येथील ज्वाईन कॅफे आणि ब्लेक कॅफे मध्ये मुला, मुलींना असभ्य वर्तन करतांना आढळून आल्याने पोलीस प्रशासनाव्दारा सदर कॅफेचा परवाना रद्द करण्याबाबतचे पत्र प्राप्त झाले होते. परंतू सदर धारकांनी व्यवसाय परवाना घेतला नसून मनपा आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशान्वये तसेच मनपा उपायुक्त गीता वंजारी यांच्या मार्गदर्शनात पोलीस विभागाच्या उपस्थितीमध्ये मनपा बाजार/परवाना विभागाव्दारे सदर कॅफे वर आज दि. 15 डिसेंबर 2023 रोजी सील लावण्याची कारवाई करण्यात आली आहे.
यावेळी बाजार/परवाना विभाग प्रमुख राजेश सोनाग्रे, सिव्हील लाईन पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सुभाष वाघ, भुषण मोरे, बाजार/परवाना विभागाचे सुरेंद्र जाधव, गौरव श्रीवास, सनी शिरसाट, उदय ठाकुर, सुधाकर सदांशिव, निखील लोटे, पुर्व झोन कार्यालयाचे राजेश जाधव, कनिष्ठ अभियंता नरेश कोपेकर, आरोग्य निरीक्षक शैलेश पवार, पंकज पोफळी तसेच सिव्हील लाईन पोलीस स्टेशनचे कर्मचा-यांची उपस्थिती होती.