सिनेस्टाईल थरार होन्डा डब्लु आरव्ही कारचा पाठलाग करून एक आरोपी अटक एक फरार!.

सिनेस्टाईल थरार होन्डा डब्लु आरव्ही कारचा पाठलाग करून एक आरोपी अटक एक फरार!.

> स्थानीक गुन्हे शाखा अकोला ची सांगली येथे धाडसी कार्यवाही

> पाठलाग दरम्यान अपघात ग्रस्त कार सह फरार आरोपीचा आयफोन जप्त.

•चोरीस गेलेले १३ तोळे सोन कार मोबाईल सह एकुण १८, लाखाचा मुद्देमाल जप्त

जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील निलेश नवलकिशोर राठी. महेश कॉलणी जुने शहर अकोला हे दिनांक २९/११/२३ रोजी सकाळी ११:०० वा ते ०१:०० या दरम्याण घर बंद करून, त्याचे दुकाणात गेले होते. याचा फायदा घेत चोरट्याने घरात हात साफ केला होता सदर चोरीचा तपास करत पोलिसांनी आरोपीला अटक केली सविस्तर वृत्त असे
गिता नगर दिनांक २९/११/२३ रोजीची दिवसा घरफोडी
फरार आरोप लोकेश सुतार रेकॉर्ड वरील अट्टल घरफोड्या. आतापर्यत कर्नाटक राज्यासह, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, बारामती, पुणे ग्रामीण येथे अनेक गुन्हे दाखल.
गुन्हयात सह आरोपी असलेला व काही मुद्देमालाची व्हिलेवाट लावलेला आरोपी नामे अरूण वसंत पाटील रा. ग्राम लिंगनूर ता. मिरज जि. सांगली यास गुन्हयात अटक.तीन वर्षापुर्वी लोकेश सुतार चालवत असलेली गुन्हेगारी टोळीने घरफोडी, जबरी चोरी, दरोडा, आर्म अॅक्ट सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हयांची नोंद असल्याने पो. स्टे मिरज ग्रामीण मार्फत तत्कालीन पोलीस अधीक्षक यांनी केले होते चार जिल्हयातुन हद्दपार (सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा).पोलीस स्टेशन जुने शहर अकोला हद्दीतील निलेश नवलकिशोर राठी. महेश कॉलणी जुने शहर अकोला हे दिनांक २९/११/२३ रोजी सकाळी ११:०० वा ते ०१:०० या दरम्याण घर बंद करून, त्याचे दुकाणात गेले होते. काही कामानिमीत्य पुन्हा घरी आले असता त्यांना दिवसा घरफोडी झाल्याचे दिसुन आले. घरफोडी मध्ये त्यांचे
लाखोंचे सोन्याचे दागिने बोरी झाल्याबबत त्यांनी पो. स्टे जुने शहर अकोला येथे रिपोर्ट दिल्यावरून अप नं ४५४/२३ कलम ४५४, ३८० भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. दिवसा ढवळ्या झालेल्या घरफोडीमुळे पोलीसांसमोर एक आव्हान होते. मा. पोलीस अधीक्षक श्री. संदिप घुगे
यांनी तात्काळ स्थागुशा येथील प्रभारी अधिकारी दुयम अधिकारी यांना त्यांचे पथकासह भेट देवून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश / मार्गदर्शन केले होते.या दरम्याणच दिनांक २७/११/२३ रोजी पातुर येथील लक्झरी मधून ८० लाख रूपये नगदी चोरी प्रकरणात एक पथक मध्यप्रदेश रवाना झाले होते. सदर पथक हे परत आल्यानंतर काही दिवसांपूर्वी स्थागुशा येथील पथकाला गोपनिय बातमीदारामार्फत सांगलीयेथील अट्टल घरफोड्याने घरफोडी केली असल्याची बातमी मिळाली होती. सदर बातमीच्या खात्रीसाठी व ईतर पुरावयाच्या अनुषंगाने घटनेच्या दिवशीचे आरोपीच्या मालकीची असलेली, होंडा WRV कारचे CCTV फुटेज घटनास्थळाचे भागात निष्पन्न झाल्याने ईतर तात्रिक विश्लेषन सह खात्री पटल्याने पो. नि श्री. शंकर शेळके स्थागुशा, अकोला यांचे मार्गदर्शनात एक पोउपनि, व पाच अमंलदार यांचे पथक गठीत करून दिनांक १३/१२/२३ रोजी सांगली जिल्हयात खाना केले होते. दिनांक १४/१२/२३रोजी दुपारी गुन्हयात वापरलेली कार व आरोपी सांगली कोर्ट भागात असल्याचे समजल्याने, सदर भागात सापळा रचला होता. संशीत आरोपी हा त्याचे साथीदारासह त्याचे गाडीमध्ये बसल्या बरोबर पथकाने गाडी आडवी लावून, त्यास पकडण्यासाठी गेट उघडण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्वरीत गाडी सुरू करून रिव्हर्स गाडी पळवून मिळेल त्या रोडने दोन
वाहनांना धडक देवून पळूण जाण्याचा प्रयत्न केला. पळण्यासाठी योग्य जागा नसल्याने काही अंतरावर जावून ईलेक्ट्रीक पोलला धडक दिल्याने गाडीचे टायर फुटून गाडी बंद पडली. त्या दरम्याण आरोपीने मिश्र वस्तीवा व पोलीस दुर असल्याचा फायदा घेवून कारमधून पळ काढला.
पथकाने पळुन गेलेल्या आरोपी पैकी एक आरोपी नामे अरूण वंसत पाटील यास गोपनिय बातमीदाराच्या मदतीने रात्री उशीरा शिताफीने चौकशीकामी ताब्यात घेतले. सदर आरोपीने अकोला येथील घरफोडी करतांना आरोपी लोकेश सुतार सह सोबत असल्याचे कबुल करून गुन्ह्यातील काही मुद्देमाल हा काढून देण्याबाबत कबुली दिली.सदर आरोपीच्या मदतीने एकुण १३ तोळे सोने जप्त करण्यात आले असुन गुन्हयात वापरलेली कार व आरोपीचा आयफोन गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला आहे. गुन्हयातील अपघात ग्रस्त कार ही चालविण्याचे परिस्थीतत नसल्याने तसेव लेखी पत्र देवून पो. स्टे मिरज शहर जि. सांगली यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
प्रमुख फरार आरोपी ताब्यात आल्यानंतर अकोल्यातील अधिक गुन्हे उघड होण्याची शक्यता असून गुन्हयातील उर्वरीत मु‌द्देमाल देखील जप्त करण्यात येईल.
सदर गुन्हयात एकुण कार, मोबाईल व सोने सह एकूण अं १८ लाखावा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी हा पुढील कार्यवाहीसाठी पो. स्टे जुने शहर अकोला यांचे ताब्यात देण्यात येत आहे.
सदर कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे साहेब, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, यांचे मार्गदर्शनात स्थानीक गुन्हे शाखा अकोला चे प्रमुख पो. नि श्री. शंकर शेळके यांनी स्थापन केलेल्या पथक प्रमुख पोउपनि गोपाल जाधव, पो. अंमलदार वसीमोद्दीन शेख, रविंद्र खंडारे, अब्दुल माजीद, महेंद्र मलिये, एजाज अहेमद, यांनी प्रत्यक्ष कार्यवाही पार पाडली.सदर कार्यवाही पार पाडण्यासाठी सायबर सेल चे पो अं आशिष आमले हे स्थानीक गुन्हे शाखा प्रमुख व पथक प्रमुख यांचे संपर्कात राहुन मोलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news