दुचाकीस्वार युवकाचा अपघाती मृत्यू अपघात की घातपात ? आशा चर्चांना उधान
पातुर : अकोला वाशिम राष्ट्रीय महामार्गाचे निर्माण काम चालू असून याच्यामध्ये मांटो कार्लो कंपनीच्या निष्काळजीपणामुळे आतापर्यंत अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. काल रात्री अकोला येथील युवक पातुर वरून अकोला जात असताना एम.एस.ई.बी सब स्टेशन जवळ वळण महामार्गाला दिशा फलक नसल्याने युवक हा सरळ चुकीचा मार्गाने गेल्याने अपघात होऊन घटनास्थळी ठार झाला.
अकोला येथील युवक सुरज माणिकराव अहिर वय 24 वर्ष रा. कौलखेड हा आपल्या दुचाकीने पातूर वरून अकोल्याकडे जात असताना सब स्टेशन जवळ त्याचा मोठा अपघात होऊन रात्रभर जखमी अवस्थेत पडून राहिला हा अपघात रात्रीला कोणाला न दिसल्याने युवक उपचारावीना मरण पावला. सदर घटनेची माहिती आज सकाळी पातुर पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला व पुढील तपास ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय तडसे करीत आहेत.
आज झालेल्या अपघात मृतक सूरज अहिर याची दुचाकी त्याचा एक नातेवाईक पातूर येथे आला होता.मृतक सूरज हा आपली दुचाकी परत घेण्यासाठी पातूरला आला व दुचाकी घेऊन रात्री दीड वाजताच्या सुमारास अकोल्याकडे निघाला असता त्याचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.पण सदर अपघातात नविनच असलेल्या दुचाकीचे काहीच नुकसान झालेले नाही तसेच 3 फुटाची खोल नाली ओलांडून दुचाकी रस्त्याच्या कडेला पडलेली होती व सदर युवकाचा पाय पोटरीपासून तुटून वेगळा झालेला असून त्याच्या पायाचा तुटलेला अवशेष देखील घटनास्थळी मिळून आला नाही.या संपूर्ण बाबी पहिल्या तर हा अपघात आहे की कोणी पाळत ठेवून केलेला घातपात आहे अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू असून याचा गांभीर्याने तपास होणे गरजेचे आहे.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा