अकोला मनपातील पुन्हा सहा.आयुक्त मनपाचे वाहन घेऊन खाजगी कामाकरिता अमरावतीचा दौऱ्यावर!

अकोला मनपातील पुन्हा सहा.आयुक्त मनपाचे वाहन घेऊन खाजगी कामाकरिता अमरावतीचा दौऱ्यावर!

अकोला :- जेमतेम दोन दिवस उलटत नाही तर पुन्हा महानगरपालिकेच्या सहा.आयुक्त पदी असलेल्या अधिका-र्यांने आपल्या खाजगी कामाकरिता मनपाचे वाहन अमरावती दौरा केला आहे. मनपातील कर्मचारी वाटेल तसे वागत असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आता निर्माण झाली आहे. सामान्य नागरिक आपल्या घामाचा पैसा टॅक्स स्वरूपात मनपामध्ये जमा करत असतात.

मात्र अधिकारी या पैशाचा दुरुपयोग करीत वाटेल तशा पद्धतीने हा पैसा खर्च करत असतात. आता या प्रकरणात आयुक्त ही हतबल झाल्याचे दिसुन येत आहे. अकोला शहरातील नागरिकांच्या घामाच्या पैशाचा आपल्या कामासाठी योग्य उपयोग करित असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. याआधी सत्य लढाने मनपाचे अधिकारी आयुक्त यांची परवानगी न घेता मनपाचे वाहन डिझेल पेट्रोल सहित आपल्या खाजगी कामाकरिता वाहन क्रमांक.MH 31 CN 4632 हे वाहन घेऊन दिनांक 15 डिसेंबर रोजी हे वाहन अमरावती येथे केले आहे. या वाहनाचे रीडिंग घेतले असता एका दिवशी 214 कि मि चालले आहे. जी पी एस विभाग प्रमुख करतात तरी काय! असा प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडला आहे.जीपीएस रोज कार्यरत असते कोणते वाहन कुठे आहे हे पाहणे जीपीएस विभागाचे काम असते.

मात्र यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण होत असल्याचे दिसून येत आहे.जि आय एस.विभाग पैसे घेऊन सेटिंग करतात अशी चर्चा मनपात सुरु आहे. दिनांक 15 डिसेंबर रोजी सत्य लढाने संबंधित अधिकार्यांशी संपर्क केला असता माझ्या साळ्याच्या मृत्यू झाल्याचे कारण दिले परंतु अधिक चौकशी केली असता हे महाशय स्वताची फॅमिली घेऊन लग्न समारंभात हजर होते. हे त्या कार्याच्या विडिओ शुटींग मध्ये रेकार्ड झाले आहे. उगाच साळ्याचा बळी गेल्याचे यावरुन दिसुन येते.
मागिल वर्षी उत्तर झोन च्या अश्याच गैरवर्तनावर आयुक्तांनी कार्यवाही केली असती तर अशी वेळ आलीच नसती अशी चर्चा मनपा वर्तुळात सुरू आहे.
दोन दिवस आधी मुलेप अधिकारी यांना दोन वाहन कसे यावर बातमी प्रकाशित केली होती. त्यांची चौकशी प्रलंबित असताना पुन्हा मनपाचे वाहन आयुक्तांच्या विनापरवानगी बाहेर गावी गेल्याने आयुक्त यांचा वचक,दरारा थंड पडल्याचे यावरुन दिसुन येत आहे. जनतेच्या पैशाचा उपयोग जनतेसाठी होत नसुन अधिकारी स्वताच्या खाजगी कामाकरिता करत असल्याने अकोला मनपा ची प्रतिमा मलीन होत आहे. या आधी आयुक्तांनी मनपाची प्रतिमा व नाहक बदनामी पोटी काही कर्मचाऱ्यांवर आरोप करत चौकशी लावून बडतर्फ केले आता या कर्मचाऱ्यांवर कोणती कार्यवाही करतात हे पाहणे औतुक्याचे होणार आहे. यासर्व घडामोडीत मात्र जिंवत असलेला साळा नक्कीच मरणावस्थेत गेला असेल हे मात्र नक्की संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news