सिंचन विहिरी साठी दलालाचा सुळसुळाट
पंचायत समिती अंतर्गत महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्यास शासनाच्या सिंचन विहीर देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे त्यानुसार अकोला जिल्ह्यातील 535 ग्रामपंचायतीसाठी वर्ष 23 24 वर्षाकरिता 8025 सिंचन विहिरीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे त्याप्रमाणे प्रत्येक तालुक्याला सुद्धा सिंचन विहिरीचे उद्दिष्ट नेमून दिले आहे त्या अंतर्गत पातुर पंचायत समितीमध्ये 57 ग्रामपंचायतीमध्ये 855 सिंचन विहिरीचे उद्दिष्ट असताना प्रत्येक ग्रामपंचायतीला 15 सिंचन विहिरीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे त्यानुसार पातुर पंचायत समितीमध्ये सिंचन विहिरीसाठी तालुका भरातील शेतकऱ्यांची रहदारी वाढली आहे आणि वेळ साधून पंचायत समितीमध्ये दलाल सक्रिय झाले आहेत प्रत्येक सिंचन विहिरीसाठी मनरेगा अंतर्गत चार लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे हाच विहिरीचा निधी मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांची लुबाडणूक होण्याची दाट शक्यता आहे प्रत्येक लाभार्थ्याकडून वीस ते पंचवीस हजार रुपये सिंचन विहीर साठी नंबर लावणार म्हणून उकळण्यात येत असल्याचे खमंग चर्चा पातुर पंचायत समिती अंतर्गत आहे यामुळे खरंच पात्र लाभार्थ्यांना सिंचन विहीर मिळेल की दलालामार्फत मागील दराने अर्ज देणाऱ्या लाभार्थ्यांना विहीर मिळेल हा गंभीर प्रश्न आहे.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा