ग्रामसेवकां च्या संपामुळे ग्रामपंचायत मधिल कामे ठंप्प!
जोमाने सुरू असणारे घरकुल व सिंचन विहिरीचे कामासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी पूर्तता करण्यासाठी लाभार्थ्यांचे हाल
ग्रामीण भागातील नागरिकांचे कामे रखडली
महाराष्ट्र राज्य पातळीवर हिवाळी अधिवेशन सुरू असताना प्रथमच संपूर्ण ग्रामपंचायत पातळीवर ग्रामसेवक व सरपंच, संगणक परिचालक संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, ग्रामरोजगार सेवक संघटना हे १८ डिसेंबर ते पुढील तीन दिवस संपावर जाणार असल्याने जिल्हा ग्रामसेवक संघटनेचा संप असल्याने बहुसंख ग्रामपंचायत मधिल कामे रखडली आहेत नागरिकांच्या घरकुलांचे प्रश्न, गाव विकासातील महत्त्वाचे कामे , शासकीय योजना या सर्वांना पूर्णविराम बसला आहे,
यावेळी ग्रामपंचायत मधील कुठलीही मीटिंग सभा व महत्त्वाची कामे रखडली आहेत नागरिकांचा घरकुलांचे प्रश्न , शेतकऱ्यांना सिंचन विहिरी, अशा महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामपंचायत निगडीत संघटनांनी राज्य पातळीवर संप पुकारला आहे मागण्या चा प्रश्न मार्गी लावा अशी मागणी या संघटनांनी केली आहे तर या संघटनांनी विविध मागण्यांच्या संपाला शासन समतोल तराजूत काट्याने निर्णय देऊन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार का संप मागे घेण्याच्या प्रश्नांना आश्वासनाचे तराजू लावनार या कडे सर्व वर्गातील नागरीकांचे लक्ष वेधले आहे
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा