केळीवेळी येथील कबड्डी स्पर्धेचा शानदार समारोप : महिला गटात ठाणे संघाने मारली बाजी

केळीवेळी येथील कबड्डी स्पर्धेचा शानदार समारोप : महिला गटात ठाणे संघाने मारली बाजी
खुल्या कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद खान्देश संघाकडे
केळीवेळी – हनुमान क्रीडा प्रसारक व बहुउद्देशीय मंडळातर्फे आयोजित अखिल भारतीय खुल्या कबड्डी स्पर्धेत पुरुष विभागातून साई स्पोर्टस्‌ खान्देश तर महिला विभागामध्ये महानगरपालिका ठाणे संघाने बाजी मारली. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा अतिशय थाटात संपन्न झाला.
हनुमान क्रीडा प्रसारक व बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने डॉ. राजकुमार बुले यांच्या सन्मानार्थ 14 ते 17 डिसेंबर दरम्यान केळीवेळी येथे या स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू शरद गडाख होते तर विशेष आकर्षण अभिनेते सागर साळुंखे उपस्थित होते. प्रमुख अतिथी महादेव भुईभार, विदर्भ कबड्डी असोसिएशनचे सचिव जीतू ठाकूर, प्रा. संतोष हुसे, सुनील खरोटे, रमेश वानखडे, मंगेश कराळे आदी उपस्थित होते.
अंतिम सामना साई स्पोर्ट खान्देश विरुद्ध मनपा ठाणे यांच्यात अतिशय चुस्तीचा झाला, पुरुष विभागात 45-27 मध्ये 18 पॉईंट्सने साई स्पोर्ट खान्देशने प्रथम क्रमांक पटकाविला.
महिला विभागात अमर भारत मुंबई विरुद्ध अकॅडमी दिल्ली यांच्या सेमी फायनल सामना झाला. यामध्ये एस. एस. दिल्ली संघ विजयी झाला तर मनपा ठाणे विरुद्ध नागपूर जिल्हा यांच्यात सामना झाला. यामध्ये मनपा ठाणे संघ विजयी झाला. अंतिम सामना मनपा ठाणे विरुद्ध एस. एस. अकॅडमी दिल्ली यांच्यात अतिशय चुरशीचा झाला. 25-21 गुणांमध्ये चार गुणांनी मनपा ठाणेचा संघ विजेता ठरला.
या संघांना मिळाले बक्षीस-
या स्पर्धेतील पुरुष विभागातील विजेता बक्षीस साई स्पोर्टस खान्देश संघास एक लाख रुपये, उपविजेता
महानगरपालिका ठाणे संघास 71 हजार रुपये व बाबा प्रेमदास संघ हरियाणा संघास 72 हजार रुपये देण्यात आले.
महिला विभागातील प्रथम क्रमांकाचे बक्षीस 71 हजार रुपये महानगरपालिका ठाणे, द्वितीय बक्षीस एस. एस. दिल्ली 51 हजार रुपये, अमर भारत मुंबई या संघास 39 हजार रुपये देण्यात आले.
कबड्डीच्या वारकऱ्याचा झाला सन्मान-
हनुमान क्रीडा प्रसारक व बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने डॉ. राजकुमार बुले यांच्या सन्मानार्थ अखिल भारतीय खुल्या कबड्डी स्पर्धांचे आयोजन केले होते. ज्यांची आपली संपूर्ण हयात कबड्डी खेळ हा केळीवेळीच्या मातीत रुजविण्यासाठी आपला व्यवसाय, संसार बाजुला ठेऊन केळीवेळीचे नांव थेट देशाच्या नकाशावर नेवून ठेवले आहे. लहान लहान मुलांना घडवून त्यांच्या माध्यमातून नॅशनल स्पर्धा खेळणारे खेळाडू त्यांनी या केळीवेळी गावामधून घडविले आहे. त्यांचा सन्मान हा मंडळाचे वतीने होणे हे मंडळाने आपले आद्य कर्तव्य माणुन डॉ. राजकुमार बुले यांच्या वाढदिवशीच या वर्षीच्या अखिल भारतीय क्रीडा स्पर्धा ह्या डॉ. राजकुमार बुले यांच्या सन्मानार्थ करण्याचे ठरवून त्यांना एक आगळे वेगळे वाढदिवसाची भेट मंडळाच्या वतीने देण्यात आली. यावेळी ढोल ताशे, तुतारी यांच्या मंगल सुरासह राजेशाही छत्रीमध्ये डॉ. राजकुमार बुले यांना थाटामाटात मैदानामध्ये आणुन स्टेजवर मान्यवरांच्या हस्ते डॉ. राजकुमार बुले यांचा आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाची मुर्ती भेट देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news