खडकेश्वर व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने ऐतिहासिक नानासाहेब मंदिरात देव दिवाळी साजरी
पुरातन वारसा जपणारे खडकेश्वर व्यायाम प्रसारक मंडळ
हजारो दिव्याच्या रोषणाईने बहरला मंदिर परिसर

ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या पातूर शहराला पूर्वीपासून ऐतिहासिक वारसा असलेल्या नानासाहेब मंदिर पातुर आहे त्याचप्रमाणे सुवर्णा नदी चा संगम सुद्धा पातुर शहरातील घाट परिसरातुन झाला आहे सुवर्णा नदी हे पूर्वी काळात बहुसंख्य सुवर्ण मुद्रा सापडल्याने पातुरला सुवर्णमुद्रांचा सुद्धा एक इतिहास आहे अशाच ऐतिहासिक पातुर शहरात ऐतिहासिक देव दिवाळी साजरी करण्यात आली पातूर शहरातील खडकेश्वर व्यायाम प्रसारक मंडळ हे देव दीपावली गेल्या अनेक वर्षापासून साजरी करतात तर यावेळी ऐतिहासिक नानासाहेब मंदिर हे राजांच्या किल्ल्याप्रमाणे भव्य स्वरूपात आहे नानासाहेबांचा भव्य असा वाडा आहे गाभारा आहे पुरातन बांधकाम आहे आणि मंदिर परिसरात काळा मारुती मंदिर सुद्धा आहे अशा या ऐतिहासिक धरोवरा परिसरात हजारों दिवे प्रज्वलित करून मंदिर परिसर प्रकाश मय करण्यात आला तसेच पातूर शहरातील पुरातन असलेले स्वयंभू खडकेश्र्वर नावाने ओळखले जाणारे मंदिर परिसर या ठिकाणी सुद्धा नागदीवाडी निमित्त दिपप्रज्वलित करून परिसर प्रकाश मय करण्यात आला खडकेश्र्वर खडकेश्वर व्यायाम प्रसारक मंडळ नेहमीच नवनवीन उपक्रम आणि संकल्पनेच्या माध्यमातून समाजासमोर एक नवीन पायंडा घालण्याचे परंपरा रचत आहे परंपरा यावर्षी सुद्धा कायम ठेवत देव दिवाळी उत्सव साजरा केला.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा