पातुर शहराला अपघातांचा विळखा नवीन तारीख नवीन अपघात
आज सुद्धा एका युवकाचा गंभीर अपघात झाला असून युवकाला शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले.
पातूर शहरालगत जुने पेट्रोल पंप कॉलिटी ढाबा समोर एका अज्ञात वाहनाने पातुर कडून मालेगाव कडे मोटार सायकल क्रमांक एम एच 28 N 3822 ने जात असलेला वाडेगाव येथील रहिवासी अविनाश अवचार नामक युवकाला जोरदार धडक दिली या अपघातामध्ये युवकाच्या डोक्याला व पायांना गंभीर इजा झाल्याचे दिसून आले हा युवक 27 28 वर्ष वयोगटाचा असल्याचे समजते तर यावेळी पातुर शहरातील दूल्हे खान युसुफ खान , किरण कुमार निमकंडे, सैय्यद इरफान मेंबर , पातुर पोलीस स्टेशनचे भोंगे मेजर, रेखा ताई , महादेव डोंगरे यांनी त्वरित 108 ॲम्बुलन्स बोलावण्या करीता डॉ फैजान, सचिन बारोकार, यांना दूरध्वनीवरून कॉल करून बोलावण्यात आले व 108 ॲम्बुलन्स या गाडीने अकोला येथील रुग्णालयात अविनाश अवचार ला रेफर करण्यात आले 108 ॲम्बुलन्स ड्रायव्हर इंगळे यांनी त्वरित विलंब न करता अकोल्याला रवानगी केली पुढील तपास पातुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनात होत आहे.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा