शिवसेना वसाहत मध्ये संत सद्गुरू विदेही वसंत बाबा यांचा सत्संगाचा कार्यक्रम संपन्न!
हजारो भाविकांनी घेतले श्री संत सद्गुरू विदेही वसंत बाबा दर्शन!
अकोला शहरातील शिवसेना वसाहत मध्ये श्री संत सद्गुरु विदेही मोतीराम बाबा तसेच श्री संत सद्गुरू विदेही वसंत बाबा यांच्या वाणीतून सत्संगाचा आणी भक्त सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी श्री संत सद्गुरू विदेही वसंत बाबा भाविकांना.*संत बोध हाचि देवाचा शोध” या विषयावर बाबाजी ने भक्ती विषयी मार्गदर्शन केले या सत्संग ऐकण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच सर्व भक्तांना भेट दिली आणि हा आनंदाचा सोहळा शिवसेना वसाहत मध्ये पार पडला.यावेळी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला हा सत्संग कार्यक्रम पार पडण्याकरिता गजानन हूसे.ज्ञानेश्वरराव सोनटक्के. जयकुमार गुंडेवार. गणेशराव शेरेकर .महेंद्र वाघमारे. संतोष देशमुख. संजय नेलकर. हजारो भाविक उपस्थित होते.तसेच मोतीराम बाबा आश्रम सावरबंद तालुका साकोली जिल्हा भंडारा येथे 22 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2024 या कार्यकाळात संत संमेलन व गोपाल काल्याचे आयोजन करण्यात आले आहे तरी भाविकांनी या संत संमेलनाचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी मोतीराम बाबा समितीतर्फे करण्यात आले आहे.