पंचायत समिती कार्यालयत लाच स्वीकारताना एकास अटक!
अकोला सविस्तर वृत्त असे की तक्रारदार हे दिनांक 01/03/2023 रोजी परिचर म्हणून लघु सिंचन उपविभाग जि. प.पातूर जिल्हा अकोला येथून स्वेच्छा निवृत्त झाले आहेत. निवृत्तीचे वेतन व इतर लाभ पंचायत समिती अकोला येथून मिळण्याबाबत तक्रार यांनी कार्यालयीन कागदपत्रात अकोला पंचायत समितीचा पर्याय निवडला होता. त्यानुसार तक्रारदार हे 18/12/2023 रोजी पंचायत समिती अकोला येथे जाऊन संबंधित वरिष्ठ लिपिक श्री.ठाकरे यांची भेटले असता, त्यांनी सेवानिवृत्ती वेतन व इतर लाभ मिळवून देण्याकरिता तक्रारदार यांना 2000/- रुपये लाच रक्कमेची मागणी केली असल्याबाबतची तक्रारदार यांनी अँटी करप्शन ब्युरो अकोला यांच्याकडे तक्रार केली त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी शासकीय पंचा समक्ष दिनांक 18/12/2023 रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई आजमावली असता, गैरअर्जदार ठाकरे यांनी 500/- रुपये कमी करून तडजोड अंती 1500/- रुपये लाच रक्कमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दिनांक 19/12/2023 रोजी सापळा कारवाई आजमाविण्यात आली असता पंचायत समिती अकोला येथे गैर अर्जदार ठाकरे यांनी तक्रारदाराकडून 1500/- रुपये लाच रक्कम स्वीकारली असल्याने त्यांना पंचा समक्ष रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन सिटी कोतवाली येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई मारुती जगताप, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती. देवीदास घेवारे, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.अमरावती परिक्षेत्र, अमरावती. श्री. शैलेश सपकाळ, पोली उपअधीक्षक, अकोला घटक सापळा व तपासअधिकारी पो. नि. सचिन सावंत ला.प्र.विभाग, अकोला कारवाई पथक पो.नि.सचिन सावंत, अकोला पो.नि. नरेंद्र खैरनार, अकोला, पो.अंमलदार-दिगंबर जाधव, निलेश शेगोकार, संदीप टाले, किशोर पवार, सुनील येलोने, श्रीकृष्ण पळसपगार, ला.प्र.वि.अकोला सक्षम अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला
—————————————-
सर्व नागरीकांना आवाहन
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
लाच लुचपत प्रतिबंधक,अकोला, पोलीस उप अधीक्षक @दुरध्वनी क्रं – 0724-2420370@टोल फ्रि क्रं 106 संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.