पातुर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या केंद्रप्रमुखांना डच्चू!

पातुर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या केंद्रप्रमुखांना डच्चू!

जिल्हाभरातील 59 शिक्षक केंद्रप्रमुख पदावरून कमी

आजच्या घडीला शिक्षण क्षेत्रात झपाट्याने बदल होत असताना, इंग्रजी शाळेचे प्रस्त वाढले आहे तर आर्थिक परिस्थिती बर्यापैकी असणाऱ्या पालकाचा कल आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेची स्पर्धा सुध्दा वाढली आहे,तर मराठी माध्यमाच्या शाळांना अखेरची घरघर लागली आहे, तर पटसंख्या अभावामुळे मराठी शाळा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, सर्व सामान्य जनतेच्या पाल्यांना मात्र मराठी माध्यमाच्या शाळा शिवाय पर्याय नाहीच, असे असले तरी पवित्र शिक्षण खाते मात्र या ना त्या कारणाने नेहमीच वादाचा विषय ठरत असल्याचे चित्र आहे, जिल्हा परिषदेच्या शिक्षकाकडून केंद्रप्रमुख पद काढून ते केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापकाकडे देण्यात यावी या संदर्भात स्थायी समितीच्या सभेत आदेश निघाले होते त्यानुसार संबंध शिक्षकाकडून केंद्रप्रमुख पद काढून केंद्रीय शाळाचे मुख्याध्यापकांना वर्ग करण्यात आले असून प्रसाद देश पंचायत समिती शिक्षण विभागाला देण्यात आला आहे जिल्हाभरात केंद्रप्रमुखाचे 85 पदे मंजूर असताना केवळ 18 पदे भरण्यात आली आहेत उर्वरित पदेही विषय शिक्षकांना देण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे.

पातुर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुध्दा हे सत्य वास्तव्य नाकारता येत नाही तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा अंतर्गत केंद्र प्रमुख हे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते परंतु अनुभवी व वरिष्ठ शिक्षकांना केंद्रप्रमुखाचा पदभार दिल्या जातो परंतु शिक्षण विभागात विविध प्रकारच्या समस्यांना शिक्षकांना सामोरे जावे लागत होते , त्याच्यात केंद्रप्रमुखांच्या काही मनमानी कारभार जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेत चांगलाच कसला होता ,वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने पातुर पंचायत समिती प्राथमिक शिक्षण विभाग अंतर्गत येणारे पाच केंद्रप्रमुख यांना पदावरून डच्चू उचलबांगडी करण्यात आली, दरम्यान नगरपरिषद अंतर्गत केंद्रप्रमुखांना पुर्वपदावर कायम ठेवले आहे, दरम्यान ग्रामीण भागात शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी संबंधित विभागाने आता तरी जागे झाले पाहिजे अन्यथा मराठा शाळा नामशेष होतील व सर्व सामान्य गरीब विद्यार्थी शिक्षणापासून कोसो दूर जातील एवढे मात्र निश्चित आहे.

कारवाई करण्याचे मुख्य कारण काय?
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम तथा केंद्रप्रमुख पदावर आल्यानंतर शिक्षकांना कागदपत्रे जमा करण्यातच वेळ जात होता
जिल्हा परिषदेचे केंद्रप्रमुख पदावर रुजू झाल्यानंतर शिक्षकांनी अध्यापनाची प्रक्रिया बंद केली होती. शैक्षणिक कागदपत्राच्या गुंडाळ्यात हे शिक्षक होते. काहींचा राजकीय वरदहस्त असल्याने गेल्या पंधरा वर्षापासून हे एकाच ठिकाणी पदावर होते. अशा अनेक तक्रारींची पुढी यांच्या विषयी समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली

किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news