जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर बांधकाम सभापती पदी!
जनसामान्याचे प्रश्न सोडवणाऱ्या कार्यकर्त्याला अखेर न्याय!
निखिल इंगळे सह किरण कुमार निमकंडे सत्य लढा पातूर – जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पातुर तालुक्यातील शिरला जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले सुनील फाटकर यांची पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने व आपल्या कर्तृत्व कौशल्याने बांधकाम सभापतीपदी निवड झाली आहे
सुनील फ़ाटकर हे जनसामान्याचे प्रश्न सोडवण्यामध्ये अग्रेसर असून जनतेला तात्काळ न्याय हे त्यांचे बोधवाक्य आहे.
सदर निवडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे तळागळातील कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीची तालुका कार्यकारणी पातुर तालुका वंचित आघाडीचे तालुका अध्यक्ष ओम धर्माळ महासचिव शरद सुरवाडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या बौद्धिक कौशल्यान पातुर तालुक्यामध्ये बांधकाम सभापती पद मिळाल्याने मानाचा तुरा मिळाला आहे पातुर तालुक्याला बांधकाम सभापती पद मिळाल्याने पातुर तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास होण्याची शक्यता नाकारता येत नाही सुनील पाटकर यांच्या निवडीचे सर्व श्रेय पातुर तालुक्यातील वंचित आघाडीचे सर्व पदाधिकाऱ्यांना देत आहेत
परंतु लोकसभेच्या तोंडावर सभापती पद आल्याने लोकांच्या अपेक्षांचा डोंगर सभापतीपदी राहणार आहे आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी फाटकर हे सभापती पदाला किती न्याय देऊ शकतात याकडे संपूर्ण शिरला गणाचे लक्ष लागले आहे..