पातूर शहर भाजपच्या प्रयत्नाने मिळणार 512 लाभार्थीनां घरकुल
2018 ची योजना कर्यान्वित केली :- कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार माननीय आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मीटिंग लावून 2018 पासून बंद असलेली योजना सुरु करण्यास सांगितले.
2023 साठी नवीन अर्ज मागवले:- 2018 मध्ये अर्ज न करू शकलेल्या लोकांसाठी कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन माननीय श्री रणधीरभाऊ सावरकर यांनी अवघ्या 19 दिवसात म्हाडा येथून नवीन अर्ज करण्याची परवानगी आणून दिली.
सतत पाठपुरावा :- या योजनेतून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये म्हणून नगरपरिषद मध्ये सतत पाठपुरावा केला तसेच अपात्र ठरलेल्या 600 च्या वर लाभार्थ्यांना प्रत्यक्ष फोन करून न. प. मध्ये हजर राहून भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या अर्जातील त्रुटी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला
512 घरकुल मिळणार:- सकारात्मक न.प.मुख्याधिकारी सैयद एहसानोंद्दीन, अफसर साहेब त्यांचे कर्मचारी आणि भाजप कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून 512 लाभार्थीना घरकुल मिळण्याचा रस्ता मोकळा झाला आहे….