अकोला महापालिकेचा भोंगळ कारभार नेहमीच दिसत असतो, मात्र यावर कोणतीच कारवाई केल्या जात नाही. असाच अंडरपासचा भोंगळ कारभार आज उघडकीस आलाय. गेल्या अनेक दिवसांपासून अंडरपासमध्ये पाणी जमा होण्याची समस्या आहे. आणि आज या अंडरपासच्या पाण्यात एक कार फसली आणि कारच मोठं नुकसान झालं. सुदैवाने यात काही दुर्घटना झाली नाही. मात्र कार मधील लोकांना कार लोटत पाण्याबाहेर काढावी लागली. अंडरपासमध्ये पाणी शिरल्यावर संबंधित प्रशासनाने अंडरपासच्या प्रवेश द्वारावर ब्यारेगगेट्स लावणे गरजेचे होते, जेणेकरून कोणतीही वाहन आत जाणार नाही. परंतु ब्यारेगगेट्स नसल्याने कार अंडरपासच्या आत गेली आणि पाण्याचा अंदाज न आल्याने कार पाण्यात फसली. यात अधिकारी जबाबदार असून अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केली जात आहे.