कृषी दुतांनी दिली कृषी सुक्ष्म अन्नद्रव्याविषयी माहिती
जळगाव (जा) : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय जळगाव जामोद येथील चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत बोराळा बुद्रुक येथील गावकऱ्यांना शेती निगडीत माहिती दिली. तसेच शेतीसंबंधीत सूक्ष्म अन्नद्रव्याबाबत माहिती सांगितली. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याच्या अभावामुळे पिकाच्या वाढीवर होणारे परिणाम याबाबत समजावून सांगितले. या दरम्यान प्राचार्य योगेश गवई, कृषी महाविदयालयातील माती विज्ञान विषयाचे प्राध्यापक समाधान काळे, प्रा. अविनाश अटोळे, प्रा. विद्या कपले यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील कृषिदूत ज्ञानेश्वर गिरी, रितेश हिस्सल , भावेश हातझाडे , रोहन गोसावी, सुमंत गोंडी आणि सुदर्शन रेड्डी यांनी कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी रित्या पार पडले