जन्मदिवसाच्या निमित्ताने गोरगरीब तसेच गरजू विद्यार्थ्यांना लेटर बुक व पेन्सिल किट चे वाटप
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा – तपे हनुमान व्यायाम शाळेचे संचालक पैलवान बालू बगाडे यांचा वाढदिवसा निमित्ताने गोरं गरीब विद्यार्थ्यांना लेटर बुक पेन्सिल किटचे वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद शाळा हरिश्चंद्र येथील विद्यार्थ्यांना हे वाटप करण्यात आले व त्यानंतर भटके व अतिशय दुबळे गोरगरीब या हिवाळ्यात अतिशय थंडीमुळे उघड्यावर राहणारे व आपला उदरनिर्वाह करणारे अशा गरजू गरिबांना कंबल वाटप करण्यात आले तर पैलवान बालू बगाडे उर्फ अनंत बगाडे राजकीय क्षेत्रात त्यानंतर सामाजिक धार्मिक व व्यायाम शाळेच्या माध्यमातून अनेक तरुण युवकांना आपल्या मार्गदर्शनाने घडवण्याची काम व मदतीला धावून जाणारा व्यक्तिमत्व अशी ओळख निर्माण झाली आहे यावेळी पातुर शहरातील सामाजिक कार्यकर्ते विलास देवकर , महेश देवकर, राहुल भगत, गणेश गाडगे, रोशन देवकर, शाम गाडगे, मयुर बोचरे, डिगा़बर उमाळे, अनिकेत निमकंडे, आशीष राऊत, यांनी वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम घेतले.