गोवंश जनावरे चोरी करून कत्तल करून विक्री करणारी टोळीचा पर्दाफास करून एकूण ११ आरोपीतांना अटक!

गोवंश जनावरे चोरी करून कत्तल करून विक्री करणारी टोळीचा पर्दाफास करून एकूण ११ आरोपीतांना अटक!

 

स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांची सर्वात मोठी कारवाई!

स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांचे कडुन अकोला जिल्हयातील गोवंश जनावरे चोरी करून कत्तल करून विक्री करणारी टोळीचा पर्दाफास करून एकूण ११ आरोपीतांना अटक जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यातील १६ गुन्हे उघडकीस गुन्हयात वापरेलेली इनोव्हा, टाटा व्हिस्टा, मोटारसायकल सह एकूण २०,९९,५०० रु. चा मुददेमाल जप्त

> स्थानिक गुन्हे शाखेकडून गोवंश चोरी करणारे टोळी गजाआड,

> जिल्हयातील विविध पोलीस स्टेशनमधील १६ गुन्हे उघड,

> १) एक इनोव्हा चारचाकी वाहन

> २) तीन टाटा इंडिका विस्टा चारचाकी वाहने

> ३) तीन मोटार सायकली

> ४) एकुण सहा मोबाईल

> ५) एकुण ११ आरोपी अटकेत

६) रोख ३,००,०००/- रू.

> ७) असा एकुण २०,९९,५००/- रू.चा मुददेमाल जप्त.

सन २०२३ मध्ये अकोला जिल्हात मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरे चोरीची मोठ्या प्रमाणात घटना घडत असल्याने मा. पोलीस अधिक्षक साहेब अकोला यांनी आदेशित करून गुन्हे उघडकीस आणने बाबत सुचना दिल्याने स्थानिक गुन्हे शाखा, अकोला चे प्रमुख श्री. शंकर शेळके यांनी गोवंश जनावर चोरीचे गुन्हे उघडकीस आणनेकरीता पथक गठीत केले. या पथकाने गोपणीय बातमीदाराकडुन तसेच तांत्रीक तपासावरून आरोपी नामे १) शेख शकील शेख जलील वय ४२ वर्षे रा. खैर मोहम्मद प्लॉट, अकोला २) शेख राजीक शेख रज्जाक वय ३५ वर्षे रा. इंदीरा नगर, वाडेगाव, ता. बाळापुर, जि. अकोला ३) मो. असलम मो. अशरफ वय ३६ वर्षे रा. इंदीरा नगर, वाडेगाव, ता. बाळापुर, जि. अकोला, ४) जाहीद अली राजीक अली रा. ताहपुरा, अकोट ५) नसीर उद्दीन अलीम उद्दीन रा. ताहपुरा, अकोट ६) गुलाम शाहीद उर्फ बबलु गुलाम राजीक रा.थारोळी वेस, अकोट (७) शेख शारीफोद्दीन शेख अलीमोद्दीन रा. ताहपुरा, अकोट ८) कुदरत खान अहेसान खान रा. इफतेखार प्लॉट, अकोट ९)

शेख ईरफान शेख उस्मान रा. ख्वाजा नगर, अडगाव बु.१०) वसीम अहेमद जहुर अहेमद रा. कागजीपुरा, अकोट ११) अन्सार अहेमद मुक्तार अहेमद रा. कांगारपुरा, अकोट यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी अकोला जिल्हा येथील पो.स्टे. बार्शिटाकळी, पातुर, बाळापुर, उरळ, सिटी कोतवाली, अकोट फाईल, दहिहांडा, अकोट शहर, हिवरखेड, तेल्हारा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनचे एकुण गोवंश चोरीचे १६ गुन्हे उघडकीस आणुन गुन्हा करतांनी गुन्हयात वापरलेले चारचाकी वाहने, मोटार सायकली, आरोपीतांची मोबाईल एकुण ६ नग व नगदी ३,००,०००/- रू. असा एकुण २०,९९,५००/- रू.चा गुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

१) पो.स्टे. पातुर अप क.३६३/२३ गुन्हयात एक इनोव्हा चारचाकी गाडी किं.अं.८लाख, एक बजाज पल्सर मो.सा. किं. अं. १ लाख, दोन मोबाईल ११,५००/- रु. नगदी ५००० रु. जप्त करण्यात आले.

२) पो.स्टे. पातुर अप. कं. २२५/२३ गुन्हयात १७,००० रू. जप्त करण्यात आले.

३) पो.स्टे. बाळापुर अप.क १८३/२३ गुन्हयात ३३,००० रू. जप्त.

४) पो.स्टे. बाळापुर अप.कं. ७१०/२३ गुन्हयात ३०,००० रू. जप्त.

५) पो. स्टे बाळापुर अप. कं. ७१२/२३ गुन्हयात ३३,००० रू. जप्त.

६) पो.स्टे. बार्शिटाकळी अप. कं. ९०/२३ गुन्हयात ८,००० रू. जप्त. (७) पो.स्टे. उरळ अप.कं. ३७८/२३ गुन्हयात ३२,००० रू. जप्त करण्यात आले.

८) पो.स्टे. सिटी कोतवाली अप.क. २३६/२०२३ कलम ३७९ भा.द. वि. मध्ये फिर्यादी उमेश रविंद्र

लांडगे रा. अनिकट अकोला याचे गोवंश चोरण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पण झाले आहे.

यातील वर नमुद आरोपी हे पो.स्टे. पातुर येथील अप.नं. ३६३/२३ कलम ३७९ भा.दं. वि मध्ये पुढील तपासकामी ताब्यात देण्यात येत आहे. तसेच पो.स्टे. अकोट फाईल अकोला.

• अपराध नं ४९५/२३ कलम ३७९ भा.दं. वि. गुन्हयात एकुण ३,३५,०००/- रु. चा मुददेमाल जप्त करण्यात आले.

पो.स्टे. अकोट फाईल, अकोला.

• अपराध नं ५०२/२३ कलम ३७९ भा.दं. वि. एकुण ३५,०००/- रु. चा मुददेमाल जप्त करण्यात आले.

पो.स्टे. हिवरखेड अकोला.

• अपराध नं २८०/२३ कलम ३८०,३४ भा.दं. वि. १२,०००/-रू. चा मुददेमाल जप्त करण्यात आले. पो.स्टे. दहिहंडा

• अपराध नं १४४/२३ कलम ३७९ भा.दं. वि. ५४,०००/- रू. चा मुददेमाल जप्त करण्यात आले. पो.स्टे. दहिहंडा

• अपराध नं ३५८/२३ कलम ३७९ भा.दं. वि. ५,०००/-रु. चा मुददेमाल जप्त करण्यात आले.

पो.स्टे. तेल्हारा, अकोला.

• अपराध नं ३७२/२३ कलम ३७९ भा.दं.वि. ६,०००/-रू. चा मुददेमाल जप्त करण्यात आले.

पो.स्टे. उरळ,

• अपराध नं १०/२३ कलम ३९२, ५०६,३४ भा.दं. वि. एक टाटा इंडिका विस्टा, गुन्हयात ५,३०,०000 रु. जप्त करण्यात आले..

पो.स्टे. तेल्हारा, अकोला.

• अपराध नं १५३/२३ कलम ५११ भा.दं. वि. वे असे वरील गुन्हे आरोपीतांगी कबुली दिली

सदरची कार्यवाही सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक सा. श्री संदिप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. शंकर शेळके, सपोनि कैलास भगत, पोउपनि, गोपाल जाधव, पोलीस अंमलदार दशरथ बोरकर, गोकुळ चव्हाण, रविंद्र खंडारे, भास्कर धोत्रे, उमेश पराये, अविनाश पाचपोर, महेंद्र मलिये, प्रमोद डोईफोडे, विशाल मोरे, लिलाधर खंडारे, भिमराव दिपके, सुलतान पठाण, खुशाल नेमाडे, अन्सार अहमद, ऐजाज अहमद, आकाश मानकर, फिरोज खान, स्वप्निल चौधरी, स्वप्निल खेडकर, धिरज वानखडे, अब्दुल माजिद, चालक पोशि, प्रशांत कमलाकर, मो.गफिस यांनी केली आहे.

वरील जप्त गुन्हयातील मुददेमाल संबंधीत पो.स्टे.ला जावुन फिर्यादीने संपर्क साधुन गुन्हयातील जप्त मुददेमाल घेणे संबंधाने वरील प्रेस नोटमधील आपआपले पोलीस स्टेशनला जावुन कायदेशिर प्रकिया पूर्ण करावी असे अकोला पोलीस दला मार्फत आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news