अकोल्यात सोमवारी मूकबधिरांचा राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळावा व स्नेहसंमेलनाचे आयोजन… 

अकोल्यात सोमवारी मूकबधिरांचा राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळावा व स्नेहसंमेलनाचे आयोजन… 

विदर्भातील प्रथम आयोजन, तब्बल बाराशे मूकबधिर होणार सहभागी…आ. बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते होणार उद्घाटन…अनिलभाऊ गावंडे यांचा पुढाकार
अकोला- राज्यातील मूकबधिर वर्गात सामूहिक सुसंवाद निर्माण होऊन त्यांच्यात सांस्कृतिक व सामाजिक आदानप्रदान व्हावे, त्यांच्या समस्या सुटाव्यात, मूकबधीर उपवर युवक युवतींचे लग्न संबंध जुळून यावेत यासाठी महानगरात प्रथमच राज्यस्तरीय मूकबधिर युवक युवती परिचय संमेलन व स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून यात राज्यभरातील तब्बल बाराशे मूकबधिर सहभागी होणार आहेत. याबाबतची माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. स्थानीय शासकीय विश्रामगृहात लोकजागर मंचच्या वतीने शुक्रवारी आयोजित या पत्रकार परिषदेत या एक दिवसीय राज्यस्तरीय संमेलनाची माहिती देण्यात आली. यावेळी आयोजक पंकज जायले,एड सुधाकर खुमकर,पुरुषोत्तम आवारे, आयोजन समितीचे अमोल देशमुख, गुणवंत महल्ले, अभय मुळे, अश्विन कट्टा,मुझमील खान,किशोर देशमुख, मिलिंद गोतरकर, मधुर खंडेलवाल, उमाकांत खंडेराव, जयदीप ढोले आदी उपस्थित होते. सोमवार दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सिव्हिल लाईन परिसरातील आकाशवाणी समोरील जिल्हा परिषद कर्मचारी भवनात हे मूकबधिर परिचय संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये सर्व जाती धर्मातील मूकबधिर बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. लोकजागर मंचचे संस्थापक तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिलभाऊ गावंडे यांच्या पुढाकाराने त्यांच्याच अध्यक्षतेत आयोजित या सोहळ्याचे उद्घाटक म्हणून जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) आ बच्चुभाऊ कडू हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीत मूकबधिर बांधवांना भेडसावणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय योजना यावर या कार्यक्रमात चर्चा होणार आहे. या संमेलनात 11 विवाहोश्चुक मूकबधिर बांधवांच्या आदर्श विवाहाची संकल्पना साकार करण्याचे योजले असून हा आदर्श विवाह घडवून आणण्याचा संकल्प लोकजागर मंचच्या वतीने करण्यात आला आहे. कार्यक्रमात राज्यभरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मूकबधिर बांधवांचा सन्मानही मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या एक दिवशीय संमेलनाची जय्यत तयारी अनिलभाऊ गावंडे मंचच्या मार्गदर्शनात करण्यात आली असून संमेलनस्थळी व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यभरात मूकबधिरांच्या समस्या अनंत असून त्यांना एकत्र जोडणारा दुवा अद्याप उपलब्ध नसल्यामुळे अशा वर्गात सुसंवाद होऊन त्यांच्या समस्याचे निराकरण व्हावे,मूकबधिर युवक युवतींचे संबंध जुळून त्यांचात विवाह व्हावा, त्यांच्या सामाजिक व व्यवसायिक समस्या सुटाव्यात यासाठी हा उपक्रम लोकजागर मंचच्या वतीने साकार करण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या एक दिवशीय मूकबधिर युवक युवती परिचय संमेलन व स्नेह मिलन सोहळ्यात समस्त मूकबधिर बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही या पत्रकार परिषदेत करण्यात आले. संमेलनाच्या सफलतेसाठी आयोजन समिती समवेत सुदर्शन आमले,करीम खान,बळीराम थोप, प्रणय बाबर, दिवाकर पितळे, रूपाली ढोले, रेखा महल्ले, अनिता मुळे, विद्या खंडेराव, नलिनी ढवळे, नाझिया परवीन आदी प्रयत्नरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news