दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हांची नोंदवून कार्यवाही करण्याची मागणी!
गरजवंत सकल मराठा समाज वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन!
पातूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक यांना निवेदन गेल्या अंदाजे पंधरा दिवसापासून एक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. सदरील व्हिडीओ मुळे दोन समाजात तेढ निर्माण होत आहे. व मराठा समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत व आज सुध्दा त्याचे तिव्र पडसाद उमटत आहेत. तसेच गावागावात तनावाचे वातावरण निर्माण होत आहे. सदर व्हिडीओ हा अज्ञात ईसमाचा असून त्यांनी मराठा समाजावर अश्लिल भाषेत भाष्य केले आहे.
करीता सकल मराठा समाजांच्या वतीने सदर इसमावर सदर व्यक्तीवर गुन्हांची नोंदवून कार्यवाही करण्याची मागणी चे निवेदन आज जिल्हा पोलीस अधीक्षक यांना गरजवंत सकल मराठा समाजाच्या वतीने पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत निवेदन देण्यात आले.
निखिल इंगळे सह किरण कुमार निळकंडे सत्य लढा न्यूज पातुर