आता चतुर्थ कर्मचाऱ्यांच्या अधिकाराचा निकष आयएएस झालेल्या मनपा आयुक्त लावतात
मनपा प्रशासनाच्या कामकाजात बहुजन कर्मचाऱ्यांचे शोषण
अकोला कोणत्याही कार्यालयाच्या अधिनस्त काम करणारे कर्मचारी त्यांचे वेतन सुट्ट्या व अन्य संचित रजेच्या संदर्भातील प्रश्न त्या खात्याच्या विभाग प्रमुखाकडे असतात असा प्रशासकीय संकेत ही वर्षानुवर्ष प्रशासकीय कामकाजात दिसून येतो. मात्र हा निकष व हे नियम अकोला मनपा मध्ये दिसून येत नाहीत येथील साध्या चतुर्थ कर्मचाऱ्यांच्या संचित व अर्जित रजेच्या निकषाचे प्रश्नही सरळ मनपा आयुक्तांच्या अखत्यारीत येत असल्याचा मासलेवाईक पुरावा नुकताच मनपा वर्तुळात आढळून आला आहे.
विभाग प्रमुखाने एखाद्या कर्मचाऱ्यावर निर्णय घेता सरळ मनपा आयुक्ताने निर्णय घेऊन रजेच्या संदर्भात चतुर्थ कर्मचाऱ्याला सरळ निलंबित करून ऐतिहासिक काम केल्याचा प्रकार नुकताच मनपा परिसरात घडून आला आहे. मनपाच्या नगररचना अनाधिकृत अतिक्रमण व मालमत्ता विभागाच्या कार्यालयात कुली म्हणून कार्यरत असणारे व मनपाची कर्मचारी संघटना चालविणारे सुनील इंगळे हे अधिवेशन काळात कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी विधानभवनावर जाण्यासाठी आपल्या विभाग प्रमुखांना रजेचा अर्ज दिल्यावर यावर सरळ मनपा आयुक्त कविता व्दिवेदी यांनी पूर्वग्रस्त बुद्धीने निर्णय घेऊन सरळ सुनील इंगळे यांना निलंबित करण्याचा प्रताप केला आहे.
या अजब निर्णयामुळे मनपा परिसरातील कर्मचाऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. याच पद्धतीचा अर्ज सुनील इंगळे यांनी यापूर्वी दिला असताना तो मात्र मंजूर करण्यात आला होता मात्र यानंतरच्या दिलेल्या अर्जावर सुट्टीची परवानगी न घेतल्याचा ठपका ठेवीत सरळ त्यांना निलंबित करण्यात आले आहे वास्तविक इंगळे यांच्या हक्काच्या शेकडो सुट्ट्या अजूनही शिल्लक असून त्या सुट्ट्या पैकी आपल्या संविधानिक व प्रशासकीय हक्काला अनुसरून त्यांनी या सुट्ट्या अर्ज देऊन मागितल्या होत्या या सुट्ट्या आपण कशासाठी उपभोगत आहोत याचे स्पष्ट कारणही त्यांनी अर्जात लिहिले होते मात्र अधिवेशन काळात होणाऱ्या आंदोलनाची धास्ती घेत मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनी सुट्ट्या न देता उलट इंगळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करून आपल्या अज्ञानाची जाणीव प्रशासकिय कामकाजात करून दिली आहे. या प्रकरणाचे मनपा वर्तुळात हसू होत असून अगदी शिल्लक कारणांमुळे सुनील इंगळे यांना निलंबित केले याचे कारण ही या निलंबनाच्या संदर्भात अद्याप पर्यंत मनपा प्रशासनाने स्पष्ट केले नाही.अकोला मनपात आतापर्यंत शैकडो भ्रष्टाचाराची प्रकरणे झालेले आहेत त्यावर साधी शोकाज नोटीस ही संबंधितांना देण्यात आली नाही मात्र किरकोळ रजेसाठी एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांला वेठीस धरने कितपत योग्य आहे काय असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.
सुनील इंगळे हे 1998 पासून मनपाच्या सेवेत एक प्रामाणिक व कर्तव्यवशील कर्मचारी म्हणून सुपरिचित आहेत बहुजनांच्या अनेक मनपा कर्मचारी संघटनांची ते सलग्नित असून कर्मचाऱ्यांचे सर्व तोपरी हित जोपासण्याचे सातत्याने ते काम करीत आलेले आहेत या संदर्भात अनेक वेळा त्यांची द्विवेदी यांच्याशी झळपी होऊन अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी प्रसंगी त्यांनी मनपा प्रशासनावर फौजदारी गून्हे दाखल केलेले आहे.
या झडपेचा उपटा काढून द्विवेदी यांनी सुनील इंगळे यांच्यावर फालतू अशी निलंबनाची कारवाई करून आपल्या अकलेचे दिवाळे काढले असल्याचे मनपा वर्तुळात बोलल्या जात आहे. कर्मचाऱ्यांचे सर्वोतोपरीर हित जोपासणाऱ्या अशा निरपराध कर्मचाऱ्यावर मनपा प्रशासन अशी कारवाई करते याचे आश्चर्य ही या निमित्ताने करण्यात येत आहे या अन्यआज्ञच्यआ विरोधात मनपाचे सर्व कर्मचारी लवकरच एल्गार पुकारुन मनपा आयुक्त कविता व्दिवेदी यांना विचारणार आहे अशी माहिती विश्वसनीय गोटातून प्राप्त झाली आहे.