तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवास थाटात प्रारंभ
आज हभप साध्वी सोनालीदीदी करपे यांचे हरिकीर्तन




अकोला– राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समिती अकोलाच्या वतीने व अ भा श्री गुरुदेव सेवा मंडळ अंतर्गत तीन दिवसीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवास शुनिवारी स्थानीय स्वराज्य भवन प्रांगणात मोठ्या थाटात प्रारंभ झाला.दि 25 डिसेंबर पर्यत चालणाऱ्या यात ग्रामगीता,भजनी मंडळ,सांप्रदायिक भजन मंडळ,महिला भजन मंडळे यांची उपस्थिती होती.या शोभायात्रेचे समापन स्थानीय स्वराज्य भवन प्रांगणात करण्यात आले. या नंतर महोत्सवाचे उद्घाटन संपन्न झाले.यावेळी उद्घाटक म्हणून वारी भैरवगडचे हभप ज्ञानेश्वर महाराज वाघ होते.
अध्यक्षता सेवा मंडळाचे प्रचार प्रमुख प्रकाश महाराज वाघ यांनी केली.स्वागताध्यक्ष सम्राट डोंगरदिवे यांच्या उपस्थितीत संपन्न या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे उपसर्वसेवा अधिकारी दामोदर पाटील, सुशील महाराज वणवे,कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार,कृष्णा अंधारे,एड गजानन पुंडकर,समितीचे अध्यक्ष बलदेवरव पाटील,शिवप्रकाश रुहाटीया, भानुदास कराळे, जिल्हा सेवा अधिकारी शिवाजी म्हैसने,इसतीयाक अहमद आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमापूजनाने व दीप प्रज्वलनाने या तीन दिवशीय महोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला.
मान्यवरांनी आपल्या मनोगतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचार कार्याची आज समाजाला गरज असल्याचे सांगितले. राष्ट्रसंताचे समग्र वाङ्मय हे सामाजिक कल्याणसाठी होते. आज संपूर्ण राष्ट्राला अशा वांग्मयाची गरज असून युवकांनी त्यांच्या विचाराची कास धरून सामाजिक प्रबोधन करण्याचे आवाहन यावेळी केले.या सोहळ्यात स्व कालुराम रुहाटिया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सेवाभावी श्याम चांडक यांना कार्य गौरव पुरस्कार बहाल करण्यात आला. तसेच सेवावर्ती प्रल्हादराव परिसे,जावेद जकरिया, शिवराज पाटील आदींना सन्मानित करण्यात आले.
दरम्यान महोत्सव स्थळी रासप नेते महादेवराव जानकर यांनी भेट देऊन आपले विचार व्यक्त करीत समितीच्या या सेवाभावी उपक्रमाची प्रशंसा केली. यावेळी जानकर यांनी समितीच्या या उपक्रमासाठी एक लाख रुपयाची मदत जाहीर केली. प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष बलदेवराव पाटील यांनी, संचालन शिवाजी म्हैसने यांनी केले.आज रविवार दि 24 डिसेंबर रोजी महोत्सव स्थळी सकाळी 10 वाजता शालेय तथा अंतर महाविद्यालय समूहगान स्पर्धा होणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चरित्रावर आधारित या समूहगान स्पर्धेचे उद्घाटन तबलावादक रमेश शुक्ला राहणार आहे.
यानंतर दुपारी 4 वाजता राष्ट्रसंतांचे पोवाडे हा कार्यक्रम गुलाबराव महाराज जळगाव खान्देश हे सादर करणार असून सायंकाळी 6 वाजता सामुदायिक प्रार्थना,रात्री 7 वाजता भजन कार्यक्रम होणार असून यात गुरुदेव बालिका भजन मंडळ राहीत यांची भजने होणार आहेत.या उत्सवात रात्री 8 वाजता कल्याणस्वामी संस्था चिकलांबा, जिल्हा बीड येथील हभप साध्वी सोनालीदीदी करपे यांचे हरिकीर्तन होणार आहे.यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहनअध्यक्ष बलदेवराव पाटील, स्वागताध्यक्ष सम्राट डोंगरदिवे, कार्याध्यक्ष रवींद्र मुडगावकर, उपाध्यक्ष आर आय शेख गुरुजी, डॉ गजानन काकड, सचिव डॉ त्र्यंबकराव आखरे, सहसचिव दिपक लुले ,कोषाध्यक्ष सहदेव खांबलकर, शिवाजी मैसने,एड वंदन कोहडे, सुरेश राऊत, अँड संतोष भोरे, श्रीकृष्ण सावळे गुरुजी, गंगाधर पाटील, डॉ प्रकाश मानकर, डॉ गोवर्धन खवले, रवींद्र पाटील,अनिल हरणे, चंद्रशेखर चतारे,गजानन जालमकर, मंगेश कराळे, संगीताताई गावंडे, उज्वलाताई देशमुख, नंदाताई आखरे, सुधाताई जवंजाळ,प्रीतीताई राऊत, नूतनताई कोरडे, चित्ररेखा म्हैसने, श्रीदेवी साबळे, वैशालीताई भोरे,प्रा डॉ ममता इंगोले, वैशाली सावळे समवेत तालुका संयोजक, अकोला शहर संयोजक, कार्यवाहक, पालखी सोहळा, यात्रा समिती, भोजन व्यवस्था समिती, विचारपीठ व्यवस्था समिती व व्यवस्था समितीच्या समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.