श्री दत्त जयंती व भव्य महाप्रसादा चे आयोजन
अकोला – स्थानिक डाबकी रोड स्थित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे श्री दत्त जयंती व अखंड नाम जप यज्ञ सप्ताह दि. 19 ते 27डिसेंबर पर्यंत आयोजित करण्यात आला आहे.
यामध्ये गुरुवार दि. 21 डिसेंबर रोजी नित्यस्वाहाकार, गणेश याग,/मनोबोध याग, दि. 22 डिसेंबर रोजी नित्यस्वाहाकार, गिताई याग, दि. 23 डिसेंबर रोजी नित्यस्वाहाकार, स्वामी याग, दि. 24डिसेंबर रोजी नित्यस्वाहाकार, चंडी याग, दि.25 डिसेंबर रोजी नित्यस्वाहाकार, रुद्र याग दि. 26डिसेंबर रोजी नित्यस्वाहाकार, बली पूर्णाहुती, दुपारी 12.39 वा. श्री दत्त जन्मोत्सव, दि. 27 डिसेंबर रोजी श्री सत्यदत्त पुजन, देवता विसर्जन व दुपारी 12 ते 5 पर्यंत भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त स्वामी भक्तांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष अनिलभाऊ गरड यांनी केले आहे.