केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री भारत सरकार रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त बिस्कीट व फळ वाटप करून वाढदिवस साजरा. – रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचा अभिनव उपक्रम-
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री भारत सरकार नामदार रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद द्वारा कनुभाई वोरा अंध,अपंग व मूकबधिर विद्यालयात अकोला येथे बिस्कीट व चॉकलेट वाटप करून सामाजिक दृष्ट्या वाढदिवस करून अभिनव उपक्रम राबविण्यात आला.यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शैलीत शुभेच्छा पर गीत गाऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे जिल्हासंघटक आकाश हिवराळे शिर्ला ग्रा.प.सदस्य मंगल डोंगरे, उज्ज्वल सिरसाट,कुणाल मेश्राम,शुभम गोळे,हरिष गुडधे,पंकज इंगळे,आदित्य चौधरी,सुरज तायडे,निलेश रंगारी,सतिश डेरे,सिद्धार्थ कटारे,आकाश भगत आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा