भाजपा मालेगांव शहर उपाध्यक्षपदी योगेश मुंढरे यांची नियुक्ती
सोयल पठाण
मालेगाव तालुका प्रतिनिधी
मालेगांव :-शहरातील तरूण तडफदार युवा नेत्रुत्व, व्यापारी योगेश मुंढरे यांची नुकतीच मालेगांव भाजपा शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली मालेगांव येथील बालाजी मंदीर येथे आज ११ वाजता भाजपा कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली या वेळी
भाजपा जिल्हाध्यक्ष शाम बढे ता .अध्यक्ष गजानन नवघरे , गजानराव देवळे, डॉ. विवेक माने ,राजु मुंदडा यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती केली. भारतीय जनता पक्षाचे या संवैधानिक पदावर योगेश मुंढरे हे पक्षाचे ध्येय, धोरण, व पक्ष तळागाळातील लोकां- पर्यंत पोहचुन पक्ष – बळकटीसाठी उत्कृष्ट कार्य करतील, तर तळागाळातील लोकां- पर्यंत भाजपचे ध्येय धोरण अंमलात आणुन तरूणांच्या प्रश्नांना वाचा फोडत, विद्यार्थ्यांना व अल्पसंख्याक समाजातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी सदैव तत्पर राह-तील असे नियुक्ती पत्र देऊन योगेश मुंढरे यांची मालेगांव भाजपा शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली, या निवडीने तरूनाई व नागरिकांमध्ये समाजातील आनंदाचे वातावरण पसरले असून सर्वत्र निवडीचे स्वागत केले जात आहे
नियुक्ती पत्र देतेवेळी भाजपचे शहराध्यक्ष राजुभाऊ मुंदडा भाजप नेते डॉ. विवेक माने ,संतोष घुगे ,पप्पू कुटे ,किशोर महाकाळ ,अभीषेक मुंदडा ,सुनील शर्मा ,मुन्ना मुंदडा , संतोष तिखे यांच्या सह असंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थीत होते
सुत्र संचालन सतोष तिखे यांनी केले व आभार प्रदर्शन पप्पू कुटे यांनी केले
दरम्यान भारतीय
जनता पार्टीच्या वरिष्ठांनी आपल्यावर टाकलेली जबाबदारी आपण चोखपणे सांभाळू तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सदैव कटीबध्द असल्याची प्रतिकिया
नुतन शहर उपाध्यक्ष योगेश मुंढरे यांनी आपल्या -निवडीबददल बोलतांना दिली.