ऐतिहासिक पातुर शहरातील दत्त जयंती सप्ताह प्रारंभ
पातूर :: गेल्या 63 वर्षांची परंपरा कायम ठेवत मंध्य प्रदेश बरहाणपुर येथील 170 परिवार दत्त जयंती निमित्त पातुर शहरातील मुख्य मंदिर येथे येऊन परंपरागत पद्धतीने व भाव भक्तीने उत्साहात सहभागी होतात दत्त जयंती निमित्त पातुर शहरात मंदिर परिसरामध्ये पातुर शहरातील नामांकित भजन मंडळी आपल्या भजन सुरांमध्ये गुरु दत्तांच्या सपत्यामध्ये भावगीते सादर करतात पातुर शहरातील दत्त मंदिर स्थापनेपासूनच आमले परिवाराच्या वडिलोपार्जित पूजेची परंपरा आहे पातूर शहरातील रेणुका देवी टेकडी वर दत्त मंदिर व अनुसया देवी चे मंदिर आहे दत्त महाराजांची पालखी गुजरी लाईन ते रेणुका देवी टेकडी वरील अनुसया देवी ला परंपरेनुसार नैवेद्य व भाऊ बहिणीची भेट म्हणून मोठ्या उत्साहात वाजत गाजत धपळ्यांच्या तालावर मिरवणूक काढली जाते पातूर शहरातील अनेक भक्तगण या सोहळ्याची परंपरा कायम ठेवत मंदिरात दर्शनाच्या रांगा लावतात तर दत्त जयंती निमित्त येणाऱ्या 26 डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याचे आयोजन सुद्धा केले जाते तर बाहेर राज्यातून मध्य प्रदेश येथील सुद्धा भक्तगण या मंदिरा दर्शनाला व कुळदैवत म्हणून दत्त जयंती निमित्त सहभागी होतात
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा