अकोला हैदराबाद मार्गाची कथा! नविन रस्ते आणि अपघातांचा उच्चांक

अकोला हैदराबाद मार्गाची कथा! नविन रस्ते आणि अपघातांचा उच्चांक

 

किरण कुमार निमकंडे – पातूर अकोला हैदराबाद मार्ग या मार्गाचे रुंदीकरण व चौपदरी करण केंद्रशासित दळणवळण यंत्रणा हे व्यावसायिक दृष्ट्या व कमी वेळात, कमी खर्चात, प्रदूषण विरहाला आळा घालण्याकरिता केंद्र शासनाचे धोरण देशातील अनेक मार्गांचा उद्धार करण्यात आला मार्ग हे सुखद प्रवासाच्या हिशोबाने योग्यच आहेत परंतु वाहनांच्या गतीला वेग आला आहे तर दुसरीकडे अपघात होण्याची गती सुद्धा वाढली आहे वाहन चालवताना चुकीला माफी नाही या सर्व गोष्टींचा समावेश केला असता तर समोर फक्त आणि फक्त एकच बाब लक्षात घेता येईल ठेका देण्यात आलेल्या कंपनी ला रोडचे काम करत असताना येनाऱ्या अडचणी तर या अडचणी कोण कोणत्या रोड क्रॉसिंग असलेल्या विद्युत तारा, अनेक ठिकाणी वैयक्तिक मालकी हक्क असलेल्या जागेवर चे देवाणघेवाण मोबदला त्यामुळे रोडचे रखडलेले कामे उदाहरण बघितले तर कापशी जवळील उड्डाणपूल या पुलाची एक बाजू कापशी गावात जाण्याकरिता मोकळी झाली तर दुसरी बाजू अजून पर्यंत वाहनांना प्रवेश करण्यास बंद आहे.

व वाहनधारकांना मजबुरीने त्याची साईट सोडून आऊटसाईडला आपली वाहने घेऊन जाणे भाग पडत आहेत त्याला रोड ठेकेदारी करणारी कंपनी दोशी की शासनाचे धोरण याकडे गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे रोड प्रशासन सुद्धा हलगर्जी करतं आहे असेही नाही अनेक वाहन चालक हलगर्जी आणि नशा करून वाहने चालवतात व रोड वरील नियमांचे उल्लंघन करताना आढळतात व्यसनाधीन वाहन चालकांचा वाहन चालवण्याचा प्रमाण कमी होणे अत्यावश्यक आहे त्याकरता यंत्रणेने अधिक सजग राहणे आवश्यक आहे नवीन तंत्रज्ञानाच्या मार्फत काही उपाययोजना करणे उचित आहेत तर नवीन ब्रिज खाली होणारे अतिक्रमण त्यामुळे रोड वरील वाहने ब्रिज खाली उभे राहून इतर प्रवास वाहनांना वाहन चालवण्यास येणाऱ्या अडचणी व ब्रिज खालील वडणाचे रस्ते त्या रस्त्यावर उभी असलेली वाहने त्या मुळे अपवादनात्मक मूळ नियमांच्या विरुद्ध दिशेने आपले वाहन घेऊन जाणाऱ्यांचा अपघात होतो याला जबाबदार कोण ?

शहरा लगत असणाऱ्या अनेक गावांजवळ रोड क्रॉसिंग नाही आहे त्यामुळे गावामध्ये जाण्यासाठी त्यांना लांब दुरून येऊन गावाकडे जावे लागते म्हणून येण्याचा मार्ग अवलंबतात अनेक शेतकऱ्यांचे रस्ते हे हायवे लागत असल्याने त्यांनी रस्त्याच्या मधोमध असणारे बॅरिगेट तोडून क्रॉस रस्ता बनवलेला आहे आणि ते या रस्त्याने ये जा करत असतात त्यामुळे दूरवर येणाऱ्या वाहनांना हे क्रॉसिंग माहीत नसल्यामुळे वाहनांचा अपघात होत आहे शहरालगत असलेल्या अशा क्रॉसिंग मुळे अनेक अपघात झाल्याचे निदर्शनास आले आहे आणि यामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत गेल्या दिवाळीपासून पातुर शहरा लागत असलेल्या विद्युत सबस्टेशन जवळून असलेल्या क्रॉसिंग मुळे प्रत्येक दुसऱ्या दिवशी अपघात झाल्याचे निदर्शनास येत आहे त्यापैकी अनेक तरुण आहेत ज्यांनी आपले जीव गमावले आहेतअनेक ठिकाणी तर रस्त्याच्या रुंदीकरणांमध्ये शेतकऱ्यांना उचित मोबदला सुद्धा मिळाला नाही ग्रामीण व शहरी भाग असे दोन प्रकारे शेतकऱ्यांच्या जमिनींना भाव देण्यात आले त्यामध्ये शहरी भागाला लागलेली जमिनीवर जमिनीच्या भावामध्ये अन्याय झाल्याचे दिसून येत आहे अनेक ठिकाणी शेतकरी जिल्हा अधिकारी कार्यालया मंध्ये व पाहिजे तो मोबदल्या करिता न्यायालयात चकरा मारताना दिसत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news