अजब आयुक्तांच्या दिमतीला पंचवीस कर्मच्यारीआयुक्तांचा पगार दोन लक्ष तर खर्च पाच लक्ष!
सामान्य नागरिकांच्या टॅक्स चा पैशातून होत आहे उधळपट्टी?
अकोला:- अकोला महानगरपालिकेत जगात नसेल तसे अजूबे पहावयास मिळत मिळत आहे. विशेष म्हणजे “चार आणे की मुर्गी और बार आणे का मसाला” अशी गत अकोला शहरातीची तसेच महानगरपालिकेची झाली आहे.
अकोला महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक हे शासनाने शहराच्या विकासासाठी नियुक्त केले आहे. की जनतेच्या पैशावर उधळपट्टी करण्याकरिता हे न समजण्यापलिकडे झाले आहे. सविस्तर वृत्त असे की शासनाने पाठवलेले अधिकारी यांना त्यांच्या कार्यालयात एक पिए,दोन चपराशी, व एक सिक्युरिटी गार्ड असायला पाहिजे तसेच त्यांच्या निवासस्थानी दोन कर्मचारी सुरक्षा गार्ड असायला पाहिजे मात्र अकोला महानगरपालिकेत तसे होतांना दिसत नाही. अकोला जिल्हाधिकारी यांच्याकडे तसेच पोलीस अधीक्षक यांच्याकडे एवढे कर्मचारी नाहीत. तसेच राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे ताफा नसतो तेवढेच अकोला मनपा आयुक्तांच्या निवासस्थानी एक दोन नव्हे तर चक्क 19 कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणी कार्यालयात 7 कर्मचाऱ्यांची नियुक्ती कोणासाठी? कशासाठी? जवळपास 26 कर्मचाऱ्यांरी आयुक्तांच्या दिमतीला यांचा अंदाजे खर्च काढला तर पाच लक्ष च्या वर होत असल्याचे विश्वसनीय सूत्राच्या आधारावर माहित पडले आहे. या पलिकडे दोन वाहने एक कार्यालिन उपयोगा करिता तर दुसरे वाहन घरगुती वापर करित असल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे आयुक्त यांचे वेतनावर शासन दोन लक्ष खर्च करते तर यांच्या दिमतीला पाच लक्ष खर्च होतांना दिसत असल्यामुळे “चार आणे की मुर्गी और बार आणे का मसाला” हि म्हण येथे फिट होत असल्याचे दिसुन येत आहे. शहराची बकाल व्यवस्था,वाढते अतिक्रमण,अवाढव्य बांधकाम, शहरातील कचरा .सर्वच विभाग भ्रष्टाचाराने बरबटले,एकाच ही खेटर एकाच्या पायात नसुन नियुक्त केलेले अधिकारी असा उटपटांग खर्च करत असतील शहरातील नागरिकांना सुख सुविधा मिळत नाहीत. टॅक्स भरून सुद्धा नरकयातना भोगाव्या लागत आहेत. यावर शासनाने इमान इतबारे विकासाचे नियोजन करणारे अधिकारी शहराला आता तरी द्यावे अशी सामान्य नागरिकांकडून मागणी होत आहे.