पोलीसांचे बहुरूपी बनून दुचाकी आणि भ्रमणध्वनी लंपास
दिवसाढवळ्या होत असलेल्या चोरीच्या घटनान मुळे बहुरूपी पोलीस शोधण्याचे पोलीसांना आव्हान
स्थानिक पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बाळापुर रोडवरील बेलुरा फाट्यानजीक पोलीस असल्याची बतावणी करून दोन अज्ञात व्यक्तींनी भ्रमणध्वनी आणि दुचाकी घेऊन बोभारा केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी पातुर पोलिसांनी 25 डिसेंबर रोजी पातुर पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद केली आहे ओम गजानन मोहरत व 21 राहणार पेटकर वाडी वाडेगाव यांनी सदर तक्रार पातुर पोलीस स्टेशन येथे दिली आहे ते 23 डिसेंबर रोजी रात्री अंदाजे आठच्या सुमारास आशीर्वाद ढाबा येथे जेवण करण्याकरिता बाबुळगाव मार्गे दुचाकी क्रमांक एम हेच 30 ए एच 52 82 येत असताना बेलुरा फाट्याजवळ दोन व्यक्तींनी हात दाखवून त्यांना थांबविले व पोलीस असल्याचे बतावणी केली तुझा मोबाईल आमच्याकडे दे म्हणून त्यांच्याकडून मोबाईल घेतल्याचे सदर तक्रारीत सांगण्यात आले आहे सदर मोबाईल चेक केला आणि बतावणी केली की आम्ही पातुर पोलीस स्टेशनला तुझी दुचाकी घेऊन जातो म्हणून ते मोबाईलचा दुचाकी घेऊन निघून गेले असे तक्रार करताना तक्रार मध्ये नमूद केले आहे सदर तक्रार देऊन पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा