पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील शुक्रवारी अकोला जिल्ह्यात
अकोला, दि. २७ : महसूल, पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. २९ डिसेंबर) अकोला येथे विविध कार्यक्रम होणार आहेत.
त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : वाशिम येथून शुक्रवारी दु. १२ वा. शासकीय विश्रामगृह, अकोला येथे आगमन, दु. १२.१५ वा. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे प्रयाण, दु. १२.३० वा. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त कृषी विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला उपस्थिती, दु. २ वा. आमदार वसंत खंडेलवाल यांच्या निवासस्थानाकडे प्रयाण, दु. २.१० वा. आमदार वसंत खंडेलवाल यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव.
दु. २.४५ वा. जिल्हा क्रीडा संकुलाकडे प्रयाण, दु. ३ वा. जिल्हा क्रीडा संकुल स्व. वसंत देसाई स्टेडियम येथे आगमन व ६७ व्या राष्ट्रीय शालेय व बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेला उपस्थिती, दु. ४.३० वा. जिल्हा क्रीडा संकुल येथून विश्रामगृहाकडे प्रयाण, दु. ४.४५ वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, सायं. ५ वा. अकोला विमानतळाकडे प्रयाण, सायं. ५.१५ वा. विमानतळ येथे आगमन व विमानाने शिर्डीकडे प्रयाण.